गुरू पौर्णिमेला गुरूशिष्याचे नवे नाटकाचे पुस्तक ‘देवमित’ !

पुणे : पारंपारिक आणि आधुनिक पद्धतीने अभिनय प्रशिक्षण देणाऱ्या देवदत्त पाठक यांच्या गुरूस्कूल गुफानमध्ये गुरूपौर्णिमेला गुरु देवदत्त पाठक आणि शिष्य सुमित दांगट यांनी लिहिलेल्या ‘देवमित’ या नाट्य काव्याच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सर्व शिष्यांच्या हस्ते होत आहे. पुस्तक प्रकाशन सोहळा ३ जुलैला सायंकाळी ६:०० वाजता होणार आहे.

‘देवमित’ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला प्रार्थना,उपासना,नांदी,शिवम बाक्रेच्या गुरू पौर्णिमा गीताने हा गुरू सेवा उत्सव संपन्न होईल. देवा रे देवा या देवदत्त पाठक लिखित नाटकाचा प्रयोग धनश्री गवस,ऋतूजा उत्तेकर,अक्षता जोगदनकर,तनया जाधव करतील. तसंच गुरूंनी दिलेल्या कवितेच्या ओळी वरून शिष्यांनी पूर्ण केलेया बाराखडींच्या कवितेचे वाचन आयुष सावंत, कुलदीप पाटील आणि श्रेयस झपाटे करतील.