क्यूएमएस एमएएसने केले क्यू डिवाईसेस लॉन्च !

आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देण्यासाठी घेतला पुढाकार

मुंबई : क्यूएमएस एमएएस (मेडिकल अलाईड सर्विसेस) या आरोग्यसेवा आणि वेलनेसच्या क्षेत्रातील अग्रणी कंपनीने डायरेक्ट-टू-कंझ्युमर विभागात प्रथमच प्रवेश केला आणि बॅनर क्यू डिवाईसेसअंतर्गत पॉइण्ट-ऑफ-केअर उत्पादनांची व्यापक श्रेणी लॉन्च केली आहे. भारतातील अग्रगण्य डिजिटल तंत्रज्ञान कंपनी व्हॅरानियम क्लाऊड लि. सोबत सहयोगान क्रांतिकारी मेडिकल वेअरेबल व्यानाचे देखील अनावरण करण्यात आले. व्यानाचा वेळेवर साह्य करणारे मेडिकल वेअरेबल असण्याच्या वाढत्या गरजेची पूर्तता करण्याचा मनसुबा आहे. ते महत्त्वाच्या घटकांवर सतत देखरेख ठेवण्यासाठी आणि त्वरित सूचना पाठविण्यासाठी, तसेच महत्त्वपूर्ण चढउतारांच्या बाबतीत वापरकर्त्याशी आणि त्यांच्या आपत्कालीन संपर्कांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ज्यामुळे उच्च जोखीम असलेल्या समूहांनी वापरावे असे हे डिवाईस आहे.

दिग्गज क्रिकेटर कपिल देव आणि अभिनेत्री ईशा देओल यांच्या उपस्थितीत या इव्हेण्टमध्येश अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महेश मखिजा यांच्यासह क्यूएमएस एमएएसच्या संचालक डॉ. गुड्डी मखिजा हे मान्यवर उपस्थित होते. क्यू डिवाईसेसच्या आशयांतर्गत मेडिकल डिवाईसेसची श्रेणी लॉन्च करण्यात आली, ज्यामध्ये मल्टीफंक्शन फिंगरिटिप हेल्थ मॉनिटर्स, मेश नेबुलायझर्स, पर्सनल मसाजर्स, ट्यूबलर मॅट्रेसेससह कम्प्रेसर्स, ऑटोमॅटिक ब्लड प्रेशर मॉनिटर्स, डिजिटल थर्मामीटर्स, पॉवर्ड सक्शन पंप्स आणि नॅनो स्टीमर्सचा समावेश आहे. ब्रॅण्डने प्रदान केलेली ही लाइफस्टाइल मॉनिटरिंग डिवाईसेस दर्जाच्या उच्च मानकांची पूर्तता करतात आणि ग्राहकांना आरोग्यदायी जीवनशैली देण्यामध्ये साह्य करण्याचे कंपनीचे मिशन सार्थ ठरवतात. ही उत्पादने ऑफलाइन स्टोअर्समध्ये, तसेच अॅमेझॉन सारख्या ऑनलाइन व्यासपीठांवर आणि कंपनीच्या स्वत:च्या वेबसाइटवर (QDevices.life) उपलब्ध आहेत.

डॉ. गुड्डी मखिजा म्हणाल्या, ‘ग्राहकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी सहाय्य करणे हा कंपनीचा दृष्टीकोन आहे. क्यू डिवाईसेस देणारी उत्पादने ग्राहकांच्या आरोग्यसेवा प्रवासामध्ये विश्वासार्ह सहाय्यक म्हणून सेवा देतील. यासंदर्भात विशेष उत्पादन आहे व्याना, जे आम्ही व्हॅरानियम क्लाऊड लि. सोबत सहयोगाने लॉन्च केलेले अद्वितीय डिवाईस आहे. या लाइफस्टाइल मॉनिटरिंग उत्पादनांचे श्रेय अथक मेहनत, वैज्ञानिक चौकशी आणि क्यूएमएस एमएएसने २८ वर्षांपासून चालना दिलेल्या नवोन्मेष्काराला जाते. ही उत्पादने विश्वसनीय, विश्वासार्ह व वापरण्यास सुलभ आहेत आणि त्यांिच्या माध्यमातून आम्ही भारताला आरोग्यदायी आणि आनंदी करण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करण्याची आशा करतो.’

कपिल देव यांनी सांगितले, ‘प्रत्येक व्यक्तीने हेल्थकेअरला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, हे पाहता क्यू डिवाईसेसच्या लॉन्चचा भाग होणे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. क्यूएमएसने हे ध्येय साध्य करण्यासाठी आणि सर्वांकरिता एका क्लिकमध्ये मेडिकल डिवाईसेस सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. या संस्मरणीय पुढाकाराच्या माध्यमातून क्यूएमएसने सर्वात प्रगत आरोग्यसेवा उपकरण आणि सेवा उपलब्ध असण्याची खात्री घेतली आहे, तसेच ब्रॅण्डच्या तत्त्वाशी मुलभूत असलेली बाब म्हणजेच ग्राहकांचे आरोग्य आणि स्वास्थ्याची काळजी घेण्याची खात्री घेत आहे. यामुळे रूग्णाची काळजी घेण्यासोबत उपचार निष्पत्ती अनुकूल करण्यासंदर्भात आरोग्यसेवा क्षेत्राला अधिक चालना देण्यामध्ये देखील मदत होईल.’