नेरळ:मुंबईतील सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था जीवन प्रबोधिनी ट्रस्ट. जीवन प्रबोधिनी ट्रस्ट संस्थेकडून ‘घडवू जीवन, करु प्रबोधन’ या संकल्पनेद्वारे दरवर्षीप्रमाणे वांगणी तालुक्यातील धारोळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वितरण केले. शैक्षणिक वस्तूंमध्ये दप्तर, वह्या, कंपास, चित्रकलेचे रंग कलर, पादत्राणे, खाऊ, झाडे आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक सत्यवान नर, अध्यक्ष अमित पवार, सरचिटणीस हेमंत मकवाना, खजिनदार गणेश क्षीरसागर, संयोजक गणेश पार्टे, मध्यम संयोजक रविंद्र जाधव, शाळेचे मुख्याध्यापक बळवंत शेवाळे, उपशिक्षक शैलेश बिरादार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश घुटे, काराव ग्राम पंचायत उपसरपंच नंदू शेंडे, अंगणवाडी सेविका हर्षदा ठाकरे, आधारिका फाउंडेशनचे विनायक मोरे, ग्राम पंचायत सदस्य, जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे ज्येष्ठ सल्लागार आणि सर्व सदस्य आदी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि ग्रामपंचायतीच्या लोकांनी संस्थेचे आभार मानले.