मुंबई : स्वातंत्र्यदिन जवळ आला असून यावेळी भारतीय पर्यटकांना सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठा वीकेण्डा देखील मिळणार आहे. यादरम्यान भारतीय पर्यटकांनी फिरायला जाण्याचे बेत आखले असून आध्यात्मिक स्थळांना भेट देण्याला त्यांचे प्राधान्य असल्याचे ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकच्या फ्लाइट सर्च डेटामधून पाहायला मिळाले आहे.
या सुट्टीमध्ये आध्याात्मिक संपन्न प्रवासाचा आनंद घेण्यााकडे देशांतर्गत पर्यटकांचा कल असून टॉप ट्रेण्डिंग गंतव्यांच्याा यादीमध्ये लोकप्रिय पर्यटन स्थेळांपेक्षा स्थानिक ठिकाणांचा समावेश आहे. आहे. भारताची आध्यात्मिक राजधानी वाराणसीसाठी २०२२ च्या तुलनेत फ्लाइटच्या् किंमतींमध्येा ७ टक्क्यांची वाढ झाली असताना देखील फ्लाइट शोधांमध्ये १०२ टक्यांची मोठी वाढ झाली आहे. सांस्कृितिकदृष्ट्या संपन्न प्राचीन शहर मदुराईसाठी देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत फ्लाइटच्या किंमतींमध्ये २२ टक्क्यांची वाढ झाली असताना फ्लाइट शोधामध्ये ९७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
याव्यतिरिक्त गेल्याय वर्षीच्या तुलनेत फ्लाइट शोधामध्ये सर्वाधिक वाढ दिसण्यात आलेल्या टॉप देशांतर्गत गंतव्यांमध्ये भुवनेश्वरर (९० टक्के), तिरूवंनतपुरम (७१ टक्के) आणि कोची (५१ टक्के ) यांचा समावेश होता. हे ट्रेण्ड्स पाहता स्पष्ट होते की, भारतीय देशातील वैविध्यपूर्ण आणि मोहक सांस्कृतिक ऑफरिंग्जचा अनुभव घेण्यायसाठी या लाँग वीकेण्डसचा आनंद घेत आहेत.
कायकचे भारतातील कंट्री मॅनेजर तरूण तहिलियानी म्हणाले, ‘आमच्या डेटामधून निदर्शनास येते की, भारतीय पर्यटक मदुराई, वाराणसी आणि भुवनेश्वतर अशा ठिकाणी नवीन पर्यटन अनुभवांचा आनंद घेण्यास उत्सुक आहेत. अनेक भारतीय कोलंबो, ऑकलंड, जेदाह आणि टोरोण्टोत अशा परदेशात प्रवास करण्यास उत्सुक आहेत. काही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय टॉप ट्रेण्डिंग गंतव्यांच्या किमतीमध्ये लक्षणीय घट झाली आहे, ज्यामुळे भारतीय पर्यटक या गंतव्यांकडे अधिक आकर्षित झाले आहेत. स्वातंत्र्यदिनाला लागून आलेला मोठा वीकेण्डह भारतीय हॉलिडेमेकर्ससाठी उत्सावर्धक असणार आहे आणि कायक आकर्षक दरामध्ये सुट्टीची धमाल करण्यााकरिता प्रवास करू इच्छिणाऱ्या पर्यटकांना उपयुक्त टिप्स व टूल्ससह मदत करण्यास सज्ज आहे.’
कोलंबो आणि ऑकलंडने फ्लाइट शोधांच्या बाबतीत टॉप ट्रेण्डिंग गंतव्यांच्या यादीमध्येत टॉप २ स्थान संपादित केले आहे, जिथे २०२२ च्यात तुलनेत अनुक्रमे ५ पट आणि ४ पट वाढ झाली आहे. पर्यटकांच्या शोधांमध्ये या वाढीचे श्रेय गेल्या वर्षीच्याच तुलनेत फ्लाइटच्यां किंमतींमधील सरासरी घटले जाऊ शकते. श्रीलंकेमधील कोलंबोसाठी २०२२ पासून सरासरी फ्लाइट किंमतींमध्ये १० टक्क्यांची घट दिसण्यात आली आहे, तर न्यूझीलंडमधील ऑकलंडसाठी सरासरी फ्लाइट किंमतीमध्येे गेल्या वर्षीच्याी तुलनेत १६ टक्क्यांची घट झाली आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रवास करू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी आंतरराष्ट्रीय हॉटेल्सटसाठी किंमतींमध्ये जवळपास ४ टक्क्यांची घट झाली आहे, तर देशांतर्गत हॉटेल्ससाठी किंमतींमध्ये जवळपास २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. लाँग वीकेण्ड दरम्यान देशांतर्गत हॉटेलसाठी सरासरी किंमत ६,६८६/- रूपये आहे आणि आंतरराष्ट्रीय हॉटेल्ससाठी सरासरी किंमत १४,८८५/- रूपये आहे.