मुंबई:पावसाळा कडाक्याच्या ऊनापासून थंडावा आणि दिलासा देतो. जगातील आघाडीचे ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकडॉटकोडॉटइनच्या नवीन सर्च इनसाइट्सच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकाधिक भारतीय यंदा मान्सूनमध्ये प्रवास करण्यासाठी (२२.०६.२०२३ – ३१.०८.२०२३ दरम्यान प्रवास) शोध घेत आहेत. या मोसमात भटकंतीचा मनमुराद आनंद घेण्याचे नियोजन भारतीयांनी सुरु केले असून विमानसेवांसाठी सर्वाधिक शोध घेण्यात आलेल्या देशांतर्गत गंतव्यांसंदर्भात गोवा (९ टक्के), नवी दिल्ली (४३ टक्के) आणि श्रीनगर (६४ टक्के) अव्वल तीन स्थानांवर होते. परदेशात सुट्टीचा आनंद घेण्याचे नियोजन करणाऱ्यांसाठी बाली (३५ टक्के), लंडन (११टक्के) आणि टोरोण्टो (२७ टक्के) सर्वाधिक शोध घेण्यात आलेली गंतव्य ठरली.
पावसाळी मोसमासाठी देशांतर्गत विमानसेवा शोधांमध्ये जवळपास ३२ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा शोधांमध्ये जवळपास २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशांतर्गत विमानसेवा मूल्यामध्ये ८ टक्क्यांची आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा मूल्यामध्ये ११ टक्क्यांची सरासरी वाढ झाली असताना देखील प्रवास करण्याप्रती ओढीमध्ये वाढ दिसण्यात आली आहे.
कायकचे भारतातील कंट्री मॅनेजर तरूण तहिलियानी म्हणाले, ‘मान्सून सीझन भारतीय पर्यटकांमध्ये साहसी प्रवासाचा उत्साह जागृत करतो. किंमतीमध्ये वाढ झाली असताना देखील भारतीय पर्यटक मान्सूनचा अधिकाधिक आनंद घेण्यासाठी गोवा आणि दिल्ली यांसारख्या लोकप्रिय देशांतर्गत गंतव्यांना, तसेच लंडन आणि बाली यांसारख्या आंतरराष्ट्रीय हॉटस्पॉट्सना ट्रिप्सचे नियोजन करत आहेत. कयकच्या ट्रॅव्हल सर्च आणि मनी सेव्हिंग टूल्ससह पर्यटक किफायतशीर प्रवासासह संस्मरणीय आठवणी निर्माण करू शकतात.’
उल्लेखनीय बाब म्हणजे अधिकाधिक भारतीय हॉलिडेमेकर्सची कार भाड्याने घेत स्वत:हून सुट्टीची धमाल घेण्याची इच्छा आहे. २०२२ पासून सरासरी किंमतीमध्ये ३९ टक्क्यांची वाढ झाली असताना देखील देशांतर्गत गंतव्यांसाठी रेण्टल कार्सकरिता शोधांमध्ये लक्षणीय १०३ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी कार्स भाड्याने घेणे अधिक इकोनॉमिकल (किफायतशीर) झाले आहे, जिथे २०२२ पासून सरासरी किंमतींमध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे, तर शोधांमध्ये जवळपास ५४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
सर्वाधिक शोध घेण्यात आलेल्या गंतव्यांव्यतिरिक्त कयकने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शोधांमध्ये सर्वाधिक वाढ दिसण्यात आलेल्या ट्रेण्डिंग गंतव्यांचे देखील अनावरण केले. सर्वाधिक ट्रेण्डिंग देशांतर्गत गंतव्य आहेत. श्रीनगर (१३,५६७/- रूपये), बेंगळुरू (८,९९५/- रूपये) आणि चेन्नई (७,९१२/- रूपये), तर आंतरराष्ट्रीय गंतव्य आहेत फुकेत (२६,५७८/- रूपये), बाली (३७,२९३/- रूपये) आणि लॉस एंजल्स (११७,२८९/- रूपये).