लुफ्थांसाची प्रवाशांसाठी भारतीय खाद्य पदार्थांची सुविधा

मुंबई : आपल्या बहुमूल्य भारतीय ग्राहकांसाठी विमान प्रवासामधील डायनिंग अनुभव अधिक संपन्न करण्याच्या उद्देशाने लुफ्थांसाने लोकप्रिय भारतीय खाद्य पदार्थांची सुविधा सुरु केली आहे. भारतामधून विमानाने ये-जा करणाऱ्या भारतीय प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येईल. या विशेषरित्या क्यूरेटेड केलेल्या फूड ऑफरिंग्जमध्ये भारतीय आणि पाश्चिमात्य खाद्य पदार्थांच्या मिश्रणाचा समावेश असेल. लुफ्थांसा आपल्या अतिथींना इकॉनॉमी, प्रिमिअम इकॉनॉमी, बिझेनस आणि फर्स्ट क्लास या चार प्रवास वर्गामध्ये उत्तम भोजनाची सुविधा देते.

इकॉनॉमी क्लासमध्ये गरमागरम ब्रेकफास्ट आणि गरमागरम भोजन सेवांसह अनुक्रमे दोन मेन कोर्स पर्याय (पाश्चिमात्य किंवा भारतीय शैलीमधील शाकाहारी), तसेच (पाश्चिमात्य ४० टक्के व भारतीय शैलीमधील ६० टक्के) यांचा समावेश असेल. स्नॅक्स जसे रॅप्स आणि सँडविचेस अणि पेये जसे मसाला चहा आणि कॉफी, तसेच स्पेशल भोजन पर्याय देखील उपलब्ध असतील.
प्रिमिअम इकॉनॉमी क्लासमध्ये गरमागरम ब्रेकफास्ट, गरमागरम भोजन आणि गरमागरम डिनरसह दोन मेन कोर्स पर्याय अनुक्रमे (भारतीय शैलीमधील व पाश्चिमात्य शैलीमधील), (पाश्चिमात्य शैलीमधील व इंडियन एव्हीएमएल) आणि भारतीय शैलीमधील ६० टक्के शाकाहारी आणि पाश्चिमात्य शैलीमधील ४० टक्के चिकन यांचा समावेश असेल. कोल्ड ब्रेकफास्ट आणि डिनर व्हेरिएण्ट्स देखील सर्व्ह करण्यात येतील.

बिझनेस क्लासमध्ये स्पेशल ऑफरिंग्जचा समावेश असेल, जसे एक्स्प्रेस मेनू, गरमागरम भोजनासह अद्वितीय ब्रेड पर्याय जसे मिक्स्ड वेज पराठा, जर्मन ब्रेड/रोल्ससह सर्व्ह करण्यात येईल, तसेच नवीन सलाड पर्याय देखील उपलब्ध असतील. तीन मेन कोर्सेस उपलब्ध असतील: पाश्चिमात्य शैलीमधील ५० टक्के मांसाहारी, पाश्चिमात्य शैलीमधील ३० टक्के मासे आणि भारतीय शैलीमधील ४० टक्के शाकाहारी, सोबत लोणचे, सौफ सुपारी आणि रायता. तसेच यामध्ये चीफ आणि डिसर्ट सर्विससह ताजी फळे, आइस्क्रीम, तीन प्रकारचे चीज आणि प्रादेशिक पेये जसे लस्सी, मसाला चहा व ताजे लिंबू सरबत यांचा देखील समावेश असेल.

फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दोन पाश्चिमात्य आणि दोन भारतीय मेन कोर्सेस, तसेच दोन कोल्ड अ‍ॅपीटायझर्स, वेलकम ड्रिंक्ससह प्रिमिअम नट्स, अनेक प्रकारचे ब्रेड पर्याय, चार विभिन्न रोल्स, दोन कोल्ड अ‍ॅपेीटायझर्स यामधून निवड करता येईल. या विभागामध्ये कोल्ड प्लेट व स्नॅक निवडीचा देखील समावेश असेल: १ पाश्चिमात्य शैलीमधील कोल्ड प्लेट व १ भारतीय शैलीमधील कोल्ड प्लेट (उदा. तंदूरी चिकन सलाड/रायता/वेजीटेबल सलाड्स इत्यादी.). या क्लासमध्ये डाइन-ऑन-डिमांड सर्विसेसचा देखील समावेश असेल.

स्थापनेपासून लुफ्थांसाने ताजी, स्थानिक पातळीवरून स्रोत मिळवलेली उत्पादने आणि अस्सल फ्लेवर्सचा वापर करण्यावर अधिक भर दिला आहे, ज्यामधून ऑनबोर्ड सर्व्ह करण्यात आलेल्या प्रत्येक डिशमधून स्वाद व दर्जाचे सर्वोत्तम संयोजन मिळण्याची खात्री घेण्यात आली आहे. ताजेपणाला प्राधान्य देत आणि कडक दर्जात्मक नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करत लुफ्थांसा आपल्या अतिथींना सर्वोत्तम डायनिंग अनुभव देते, जो जगभरातील प्रवाशांसाठी संस्मरणीय आणि स्वादिष्ट आहे.