‘कल्पना एक आविष्कार अनेक’

मुंबई : एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘अस्तित्व’ आयोजित कै. श्री. “मु.ब.यंदे पुरस्कृत” ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेचे यंदाचे विषय सूचक आहेत. ज्येष्ठ साहित्यिक,कादंबरीकार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ.भालचंद्र नेमाडे आणि त्यांनी दिलेला विषय आहे; “सुगंध जातो उडून, फुलानं कोठे जावं ?”

विशेष म्हणजे या विषयाची कोणतीही प्रस्तावना त्यांनी दिली नसून हा विषय इतका दैनंदिन आहे कि लेखक आपोआप लिहते होतील, असा विश्वास त्यांना आहे. या विषयाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारी एकांकिका या स्पर्धेत स्पर्धकांना सादर करायची आहे.वरवरून सोपा वाटणारा पण कठीण असा हा विषय लेखकांसमोर निश्चितच आव्हान असल्याची प्रतिकिया समाजमाध्यमात व्यक्त होते आहे. यंदा या स्पर्धेचे संयुक्त वर्ष ३७ वे असून खुल्या गटासाठी होणाऱ्या या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात.

स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार/सोमवार ०१ आणि ०२ ऑक्टोबर २०२३ तर अंतिम फेरी शनिवार ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई येथे संपन्न होईल. स्पर्धेचे प्रवेशअर्ज www.astitva.co.in आणि https://www.facebook.com/astitvateam या संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. अर्ज आणि एकांकिका पाठवण्याची अंतिम दिनांक शनिवार ३० सप्टेंबर २०२३ आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: रवी मिश्रा (+९१ ९०८२६३३२८८)