विद्यानिधीच्या बाप्पाला मुंबईचे शिक्षण निरीक्षक संजय जावीर यांची भेट!

मुंबई:विद्यानिधीच्या बाप्पाला मुंबईचे शिक्षण निरीक्षक संजय जावीर यांनी नुकतीच भेट देऊन मनोभावे आरती व पूजा केली. त्यांचे स्वागत संस्थेच्या सचिव डॉ. साधना मोढ आणि सदस्या डॉ. कीर्तिदा मेहता यांनी शाल, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मंडला व वारली कलाकृती तसेच शाळेचे सेंद्रिय खत ‘निर्माल्य शक्ती’ देऊन केले.

शिक्षण निरीक्षक संजय जावीर अटल लॅब व परसबागची (किचन गार्डन) पाहणी केली. त्यानंतर बाप्पाचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शाडू मातीच्या मूर्ती, प्रसाद व ‘आशीर्वाद तथास्तु’ या कार्यरत मॉडेलचा आनंद घेतला व गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या पंचपरिवर्तन संकल्पनेबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

संजय जावीर यांनी विद्यानिधीच्या पर्यावरणपूरक पंचपरिवर्तन उपक्रमास शुभेच्छा देऊन हा आदर्श सर्व शाळांनी घ्यावा, असे आवाहन केले.