अलिबाग येथे ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नवीन दालन सुरू

अलिबाग : १९१ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे अलिबाग येथे नवे दालन सुरू करण्यात आले आहे. अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

अलिबाग, रायगडच्या शांत परिसरात असलेले ‘पीएनजी ज्वेलर्स’चे हे दालन ३,००० चौरस फूट जागेत विस्तारलेले असून येथे दागिन्यांची वैविध्यपूर्ण आणि व्यापक श्रेणी सादर करण्यात आली आहे. दालनामधील या निवडक कलेक्शनमध्ये सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी असून ही श्रेणी ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या इतर मोठ्या दालनांप्रमाणेच आहे. या दालनामध्ये ग्राहक कलाकुसरीने तयार केलेल्या दागिन्यांची निवड करू शकतात, प्रत्येक दागिना हा कारागिरी आणि कुशलतेची अतूट बांधिलकी दर्शवतो.

ग्राहकांच्या विविध प्रकारच्या आवडीनुसार उत्पादन श्रेणींच्या विस्तृत श्रेणीसह, ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या अलिबाग येथील दालनात ब्रेसलेट, झुमका, आकर्षक सोन्याचे नेकलेस, नववधूचे भरजरी दागिने यांचा समावेश असणार आहे. तुम्ही परिधान केलेला पोशाख अधिक आकर्षक बनविण्यासाठी सोन्याचा हार, सांस्कृतिक समृद्धी दाखवणारे पारंपरिक झुमके किंवा हातासाठी दागिने शोधत असाल तर ‘पीएनजी ज्वेलर्स’ने निवडलेला संग्रह ग्राहकांना भरपूर पर्याय उपलब्ध असल्याची हमी देतो आणि त्यांच्या वैयक्तिक शैली व आवडी निवडीला अनुरूप असा दागिना शोधण्यास मदत करतो.

‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, ‘आम्हाला आमच्या ग्राहकांकडून वर्षानुवर्षे मिळालेला पाठिंबा आणि प्रेम पाहून आम्ही खूप प्रभावित झालो आहोत. एका मोठ्या फॉरमॅट स्टोअरसह अलिबागमध्ये आमचा प्रवेश हा येथील ग्राहकांकडून आम्हाला असलेल्या मागणीचा पुरावा आहे. हे दालन आमच्या ग्राहकांसाठी सोयीस्कर होण्याच्या दिशेने आमचे समर्पण दृढ करण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला विश्वास आहे की अलिबागमध्ये पीएनजीची दीर्घकाळ वाट पाहणाऱ्या ग्राहकांची इच्छा पूर्ण करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. ‘

अभिनेते स्वप्नील जोशी यांनी सांगितले, ‘अलिबागमध्ये पीएनजी ज्वेलर्सच्या नवीन दालनाच्या भव्य उद्घाटन समारंभात सामील होताना मला खूप आनंद होत आहे. मला विश्वास आहे की दागिन्यांच्या डिझाईन्सची अप्रतिम श्रेणी आणि पीएनजी ज्वेलर्सचा अद्वितीय ग्राहक अनुभव अलिबागमधील प्रत्येकाला मोहित करेल. या ब्रँडमध्ये अंतर्भूत असलेली उत्कटता आणि समर्पण प्रत्येक उत्कृष्ट दागिन्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येते, त्यामुळे ग्राहकांना या नव्याने सुरू झालेल्या दालनामध्ये खरोखर काहीतरी विशेष मिळणार आहे हे नक्की.’

या दालनाच्या उद्घाटनाचा एक भाग म्हणून पीएनजी ज्वेलर्स अलिबागमधील आपल्या ग्राहकांना खास ऑफर देत आहे. २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्के सवलत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.