छत्रपती संभाजीनगर येथील सभेचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केले स्तंभपूजन !

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे २ एप्रिल २०२३ ला महाविकास आघाडीच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे स्तंभपूजन आज मोठ्या जल्लोषात पार पडले. सभा न भूतो न भविष्यति अशी इतिहास रचणारी सभा असणार आहे अशा प्रकारची वक्तव्ये करून स्तंभपूजन पार पडले. स्तंभ पूजनासाठी शिवसेना विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख कैलास पाटीलयांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.