व्हीयूने ४३ आणि ५५ इंच ‘व्हीयू प्रिमिअम टीव्ही २०२३ एडिशन’ लाँच !

मुंबई: व्हीयू टेलिव्हिजन्स (VU) या भारतातील अग्रगण्य नवोन्मेष्कारी टीव्ही ब्रॅण्डने त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये नवीन ऑफरिंग ‘व्हीयू प्रिमिअम टीव्ही २०२३ एडिशन’ची घोषणा केली आहे. नवीन मॉडेल जागतिक स्तरावर अधिकाधिक प्रेक्षकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आले आहे. परिपूर्ण मनोरंजन सोबती व्हीयू प्रिमिअम टीव्ही २०२३ एडिशनमध्ये अत्याधुनिक वैशिष्ट्ये, सुस्पष्ट डिस्प्ले आणि उत्साहवर्धक साऊंड आहे. जे एकूण व्युईंग अनुभवामध्ये वाढ करतात. ४३ इंच आणि ५५ इंच या आकारांमध्ये उपलब्ध असलेला २०२३ व्हीयू प्रिमिअम टीव्ही घरातील कोणत्याही रूमसाठी अगदी परिपूर्ण आहे.
व्हीयू प्रिमिअम टीव्ही २०२३ एडिशन अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, व्हीयूटीव्हीजडॉटकॉम आणि भारतातील रिटेल स्टोअर्समध्ये ४३ इंच व्हर्जनसाठी २३,९९९ रूपये आणि ५५ इंच व्हर्जनसाठी ३२,९९९ रूपये या आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध असेल. व्हीयू प्रिमिअम टीव्ही २०२३ एडिशन हा या किंमतीच्या रेंजमधील सर्वात वैशिष्ट्य-संपन्न आणि हाय-क्वॉलिटी टीव्ही आहे आणि व्हीयूची पुरस्कार-प्राप्त प्रॉडक्ट, क्वॉलिटी आणि कस्टमर सर्विससह येतो.

व्हीयू टेलिव्हिजन्सच्या संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देविता सराफ म्हणाल्या, ‘व्हीयूमध्ये आम्हाला उद्योगामधील सर्वोत्तम कस्टमर केअर आणि सर्विस देण्याप्रती आमच्या कटिबद्धतेचा अभिमान वाटतो. स्वत:हून संपूर्ण ग्राहक सेवा, वॉरंटी आणि आमच्या आयएसओ ९००१ प्रमाणित २४x७ कस्टमर सपोर्ट सेंटरमधून इन-हाऊस रिपेअर्सची सुविधा देणारा एकमेव टेलिव्हिजन ब्रॅण्ड म्हणून आम्हीट ग्राहकांना अद्वितीय पाठिंबा देण्यामध्ये सक्षम आहोत. भारतभरातील १९,००० हून अधिक ठिकाणी आम्ही४ ग्राहकांसाठी गरजेच्या वेळी साह्य करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असतो. ज्यामुळे व्हीयू टीव्ही खरेदी करणारे ८१ टक्के ते ८३ टक्के ग्राहक आणखी एक टीव्ही खरेदी करतात याबाबत आश्चर्य करण्यासारखे नाही.’

नेक्स्ट-जनरेशन मनोरंजनाचे उत्तम उदाहरण असलेल्या नवीन व्हीयू प्रिमिअम टीव्ही २०२३ एडिशनमध्ये ए+ ग्रेड ४०० नीट्स हाय ब्राइट आयपीएस पॅनेल आहे, जे व्युइंग अनुभवाला सर्वोत्तमतेच्या अद्वितीय उंचीवर घेऊन जाते. टीव्हीसोबत डॉल्बी ऑडिओ असलेला ५० वॅट बिल्ट-इन साऊंडबार येतो, ज्यामधून अतिरिक्त स्पीकर्ससाठी खर्च करण्याची गरज न भासता प्रेक्षकांना विशाल आवाजामध्ये मनोरंजनाचा आनंद घेता येण्याची खात्री मिळू शकते. हा टीव्ही आधुनिक गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर संचालित आहे, जी वॉईस-अ‍ॅक्टिव्हेटेड हॉटकी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून सुलभ उपलब्धता आणि कार्यक्षमता देते. ट्रेण्डिंग लोगोमेनिया-प्रेरित बेझल तरूण गाहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी डिझाइन केले आहे.