विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगरात वज्रमूठेचा एल्गार !

संभाजीनगर: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगरात वज्रमूठेचा एल्गार करण्यात येणार आहे. २ एप्रिल २०२३ ला संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेची सर्व जबाबदारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या खांद्यावर आहे.

‘आपल्याला भाड्याचे नको ..आपल्याला हक्काचे पाहिजेत..,’ असे बोलत अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवसेनेतील शिंदे यांच्या बंडानंतर मराठवाड्यातील तळागाळात जाऊन शिवसेनेला भक्कम करण्यासाठी अंबादास दानवे यांचे परिश्रम येत्या २ एप्रिल २०२३ ला दिसणार असून सभेला २ लाख कार्यकर्ते संपूर्ण मराठवाड्यातून येणार आहे.

या सभेच्या आढावा बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतिश चव्हाण आणि आमदार विक्रम काळे,काँग्रेसचे माजी आमदार कल्याणराव काळे आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.