महाराष्ट्र दिनी छत्रपती शिवाजी उद्यान येथील खुल्या व्यायामशाळेचा खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न !

मुंबई : दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात खुली व्यायामशाळा (ओपन जीम) तरुणांना निःशुल्क व्यायाम करण्याची सुविधा देणाऱ्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनी संपन्न झाला. शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या सौजन्याने नूतनीकरण केल्यानंतर सुमारे तीन हजार फुटांमध्ये उभारण्यात आलेली अद्ययावत यंत्रसामुग्री असूनही निःशुल्क असलेली ही राज्यभरातील एकमेव व्यायामशाळा ठरली आहे. यावेळी स्थानिकांच्या वतीने खासदार शेवाळे यांचा सत्कारही करण्यात आला. महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर पार पडलेल्या या सोहळ्याला खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, विभागप्रमुख गिरीश धानुरकर, अविनाश राणे, महिला विभाग संघटिका प्रिया गुरव, माजी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे, मनसे नेते संदीप देशपांडे, विभाग अध्यक्ष संतोष धुरी, नागेश मुणगेकर यांसह अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

नूतनीकरण केलेल्या खुली व्यायामशाळेच्या (ओपन जीम) लोकार्पण सोहळ्यात बोलताना खासदार राहुल शेवाळे यांनी या व्यायामशाळेची देखभाल करणाऱ्या सर्वांचे आभार मानताना भविष्यात सर्व प्रकारच्या मदतीसाठी आपली तयारी दर्शविली. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये सुमारे ३५ वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने छोटेखानी खुली व्यायामशाळा ( सर्वांना निःशुल्क व्यायाम करता येईल अशी जीम) एका शेडखाली सुरू करण्यात आली. त्यानंतर परिसरातील दक्ष नागरिक आणि व्यायामपट्टूनी नेटाने ही ओपन जीम चालवली. केवळ दोन डंबल्स पासून सुरू झालेली ही व्यायामशाळा आज तीन हजार चौरस फुटांमध्ये उभी आहे. पहाटे सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत खुल्या असणाऱ्या या जीम मध्ये दररोज सुमारे दीड ते दोन हजार युवक व्यायाम करतात. दादर परिसरातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या ओपन जीमचे छप्पर अनेक ठिकाणी तुटले होते. तसेच व्यायामाच्या मशीन देखील जुन्या झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील धुळीमुळे देखील व्यायाम करणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेऊन महिन्याभरात या जीमचे नूतनीकरण केले. यात जीमचे संपूर्ण छप्पर बदलणे, सर्व बाजूंनी स्लायडिंग लावणे, पंखे लावणे, काही नव्या मशीन्स आणणे, काहींची डाजडूजी करणे अशा अनेक कामांचा समावेश आहे.