जागतिक बाल रंगभूमी दिनानिमित्त बाल रंगभूमी तज्ज्ञ प्रा. देवदत्त पाठक यांची कार्यशाळा!

पुणे:जागतिक बाल रंगभूमी दिनानिमित्त गुरूस्कूल गुफांन आयोजित मुलांच्या भावना बाल रंगभूमी तज्ज्ञ प्रा. देवदत्त पाठक यांनी उजळणी संवेदित करण्यासाठी नाट्य कार्यशाळा घेतली.

मुले कायम उत्साही आणि क्रियाशील राहण्यासाठी त्यांचे मन, बुध्दी आणि शरीर यांना ‘हो रे ची भाषा’ शिकवायला हवी. प्रसंगी काहीसे कठोर होऊन करायला लावण्याचे धाडस मुलांमध्ये रुजवायला हवे. त्यासाठी नाट्य कला आणि रंगमंचीय खेळ उपयोगी पडतातच,असे मत प्रा. देवदत्त पाठक यांनी व्यक्त केले.

‘पैली ते चवथी’ या शालेय वस्तूंच्या कवितांवरचे मोहक रुपनाट्य आणि ‘जागतिक महिला दिन साजरा’ हे स्त्रीचे स्वातंत्र्य की स्वैराचार या विषयावरची २ नाटके देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून सादर झाली.सायली चव्हाण हिने नाट्य संदेशाचे वाचन केले.

प्रथमेश इंगळे, अंजली चव्हाण, आलोक, अक्षता जोगदनकर, अर्णव देशपांडे, आर्या करपे, प्रांजली,आकांक्षा,सायली बाल कलाकारांनी उपस्थितांची दाद मिळविली.यावेळी सामजिक कार्यकर्त्या उषा देशपांडे, सीमा जोगदनकर, ऋतुजा केळकर, रोटारियन हेमंत जेरे, प्राजक्ता जेरें उपस्थित होते.