जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. अग्रवाल्स् आय हॉस्पिटलच्या तज्ज्ञांकडून प्रतिबंधात्मक नेत्र तपासणीला प्राधान्य देण्याचे आवाहन

मुंबई : जगभर “हेल्थ फॉर ऑल” या संकल्पनेसह जागतिक आरोग्य दिन साजरा होत असताना वाशी आणि मुंबई येथील डॉ. अग्रवाल्स् आय हॉस्पिटल प्रादेशिक प्रमुख क्लिनिकल सर्व्हिसेसच्या नेत्र आरोग्य तज्ज्ञ डॉ. वंदना जैन यांनी नागरिकांना नेत्र आरोग्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले. ‘भारतात डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत, ही बाब चिंतादायक आहे. कारण बहुतेक लोकांना त्यांच्या नेत्र समस्यांची माहितीच नसते. त्यांच्या समस्यांचे निदान होऊन त्यावर उपचार होईपर्यंत रुग्णाच्या शरीरात रोग प्रगत अवस्थेत पोहोचलेला असतो,’ असे डॉ. वंदना सांगतात.

डॉ. वंदना यांच्या मते, ‘एकूण आरोग्य राखण्यासाठी डोळ्यांच्या चांगल्या आरोग्याची खातरजमा करणे महत्वाचे ठरते आणि नियमित प्रतिबंधात्मक नेत्र तपासणी हे संभाव्य डोळ्यांच्या समस्या लवकरात लवकर ओळखण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. डोळ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन आपले सर्वांगीण कल्याण व्हावे यादृष्टीने कृतीशील उपायाची खात्री आपण करू शकतो. डोळ्यांच्या अनेक आजारांत प्रभावीपणे उपचार केले जाऊ शकतात, परंतु उपचारात दिरंगाई केल्यास न भरून निघणारा दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो. नियमितपणे प्रतिबंधात्मक नेत्र तपासणी करून आपण डोळ्यांच्या समस्या लवकर ओळखून त्यावर उपाययोजना करू शकतो. जेणेकरून रोगाची वाढ होण्यापासून अटकाव शक्य होईल.’

डोळ्यांच्या समस्यांचा शोध लवकरात लवकर लागून डोळ्यांना होणारे पुढील नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक नेत्र तपासणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. डोळ्यांची प्रतिबंधात्मक तपासणी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या अंतर्निहित आरोग्य स्थिती ओळखण्यात मदत करू शकते, हे सगळे प्रकार डोळ्यांच्या समस्यांसाठी जोखमीचे ठरू शकतात. या आरोग्यविषयक परिस्थितींवर लवकरात लवकर उपाय केल्याने, व्यक्ती केवळ त्यांच्या डोळ्यांचे संरक्षण करू शकत नाही तर इतर आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याचा धोका देखील कमी करता येतो, असं डॉ वंदना यांनी नमूद केले.

डॉ. वंदना जैन नियमित नेत्र तपासणीचे महत्त्व सांगताना पुढे म्हणतात, ‘डोळ्यांच्या बर्यातच समस्यांमध्ये त्या प्रगत होईपर्यंत कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. त्यांचा लवकरात लवकर शोध घेणं कठीण असते. नियमित डोळ्यांची तपासणी करून लोक डोळ्यांच्या समस्या लवकर जाणून घेऊ शकतात आणि बर्याकच प्रकरणांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर बनण्यापासून प्रतिबंध शक्य होतो.’

डॉ. वंदना शिफारस करतात की, ‘प्रौढ व्यक्तींनी दरवर्षी किमान एकदा डोळ्यांची सर्वसमावेशक तपासणी केली पाहिजे किंवा डोळ्यांच्या समस्यांचा इतिहास असल्यास अथवा मधुमेहासारख्या डोळ्यांवर परिणाम करू शकणारी अंतर्निहित आरोग्य स्थिती असल्यास मुलांच्या दृष्टीची नियमितपणे तपासणी केली पाहिजे. पहिली तपासणी ही वयाच्या सहा महिन्यांत करून घ्यावी आणि त्यानंतर दरवर्षी नियमित तपासणी करावी.या जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने डोळ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वचनबद्ध राहू! नियमित प्रतिबंधात्मक नेत्र तपासणी करून, आपले डोळे निरोगी राहतील याची खातरजमा आपण करू शकतो. तसेच पुढील अनेक वर्षे जगाच्या सौंदर्याचा आनंद आपल्याला घेता येईल.