कुष्ठ पीडितांच्या वसाहतीसाठी समाज कल्याण केंद्राचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते उद्घघाटन !

मुंबई : भाजप स्थापना दिन ६ एप्रिल देशभरात साजरा करण्यात आला. अंत्योदय हे भाजपचे मुलमंत्र आहे. आमदार मनिषा चौधरी यांच्या आमदार निधीतून समाजातले वंचित पीडित असे कुष्ठपिडीतांसाठी भव्य समाजकल्याण केंद्र दहिसरच्या संजय नगर रहिवासी वसाहत येथे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे माजी राज्यपाल भाजप नेते राम नाईक यांच्या हस्ते ६ एप्रिलला उद्घघाटन करण्यात आले.

‘उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवेदन करून कुष्ठ पीडितांच्या आवास योजनेचे काम झाले, त्या प्रमाणे महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी २०१९ मध्ये निवेदन केले होते आणि त्यांनी मान्य केले होते. परंतु मधल्या काळात सरकार बदलल्याने ते अडकले आता पुन्हा महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुष्ठ पीडितांच्या आवास योजना साकार होतील,’ असे माजी राज्यपाल राम नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले.ज्येष्ठ नेते माजी राज्यपाल राम नाईक यांनी कुष्ठपिडीत लोकांना सार्वजनिकरित्या अनेक अडचणी समोर जावे लागते. यासाठी आंतरराष्ट्रीय कुष्ठ पीडितांच्या संघटना स्थापन करणे, त्याद्वारे कुष्ठपीडित बांधवांसाठी आणि त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी करण्यात आलेले अनेक प्रयत्न आदी विषय मांडले.दिव्यांग लोकांना जसे नोकरीत आरक्षण देतात, तसेच कुष्ठ पीडितांच्यासाठी व्हावे, असेही मत राम नाईक यांनी नमूद केले असून कुष्ठ पीडितांचाआनंद द्विगुणित झाला होता.

आमदार मनिषा चौधरी म्हणाल्या की,‘हा दुग्ध शर्करा योगच आहे, कारण या नवीन वास्तूचे निर्माण सर्वात प्रथम राम नाईक यांनीच केले होते. पुन्हा आज मी आमदार असताना मला या वास्तूच्या पुनः निर्माणाची संधी मिळाली आणि त्यावेळी आदरणीय राम भाऊ स्वतः उद्घघाटनासाठी उपस्थित राहिले.’

पनवेल येथील नगरपालिका ४ हजार रुपये अनुदान देत आहे. मुंबई २,५०० देत असून ते वाढवावे असे कुष्ठपिडीत संघटनाचे पदाधिकारी यांनी राम नाईक यांना निवेदन दिले.

यावेळी भाजप नेते अ‍ॅड. जयप्रकाश मिश्रा, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर,महाराष्ट्र कुष्ठ पीड़ित संघटन अध्यक्ष भूपाल फरगोने, संजय नगर रहिवासी संघ अध्यक्ष सफी शेख, योगेश मदाले, माधुरी कोपडे, प्रकाश उपाडे,माया रँगवरे, दीपक दलवी, छगन पाटिल, श्रीकांत पांडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नीलाबेन सोनी, दहिसर भाजप अध्यक्ष अरविंद यादव, आरोग्य आघाडी अध्यक्ष अशोक शाह, नगरसेवक विद्यार्थी सिंह, जगदीश ओझा, हरीश छेडा, जितेंद्र पटेल, भाजप चे विनोद मकवाणा, सुनील कदम,शशिकांत कदम तसेच कुष्ठ पीडित संघटनचे पदाधिकारी, संजय नगर रहिवासी संघाचे पदाधिकारी आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस विनोद शास्त्री यांनी केले.