मुंबई: महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि विश्वासार्ह पारंपरिक ज्वेलर्स, पीएनजी ज्वेलर्स यांनी ऐतिहासिक सातारा शहरात आपल्या नव्या दालनाचे उद्घाटन करून प्रादेशिक ज्वेलरी बाजारात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या नव्या दालनामुळे पीएनजी ज्वेलर्सची एकूण ५० दालनांची संख्या पूर्ण झाली असून हा ब्रँड आता जागतिक पातळीवर एका नव्या टप्प्यावर पोहोचला आहे.
२४ जानेवारी २०२५ ला सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या हस्ते सातारा येथील दालनाचे उद्घाटन करण्यात आले. पीएनजी ज्वेलर्सने मागील काही महिन्यांपासून त्यांच्या विस्तार धोरणाचा वेग वाढवला आहे. २०२४ च्या नवरात्रीत सलग ९ दिवसांत ९ नवीन दालने सुरू करण्याचा विक्रम पीएनजी ज्वेलर्सने रचला होता. त्यानंतर १० जानेवारी २०२५ रोजी माधुरी दीक्षित यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये भव्य दालनाचे उद्घाटन करण्यात आले. पीएनजी ज्वेलर्सच्या या नियोजित विस्तारतून दिसून येते की, द्वितीय आणि तृतीय श्रेणीत येणाऱ्या शहरांमधील ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडींना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अशा शहरांमध्ये दागिन्यांच्या आणि इतर लक्झरी वस्तूंच्या वाढत्या मागणीमुळे ही ठिकाणे भविष्यातील प्रमुख खरेदी केंद्र बनतील. १९३ वर्षांची परंपरा, ३० लाखांहून अधिक ग्राहक, आणि पिढ्यानपिढ्या टिकवलेला विश्वास ही पीएनजी ज्वेलर्सची ओळख आहे. भारतासह यूएसएमध्येही पीएनजी ज्वेलर्स आजघडीला घराघरात पोहोचला आहे.
पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘पीएनजी ज्वेलर्सने ५० दालनांचा टप्पा गाठल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. हा आमच्या दीर्घ प्रवासातील हा एक अविश्वसनीय टप्पा असून पुढे भविष्यात आणखी मोठी उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम मिळवत राहणे हेच आमचे सर्वोच्च ध्येय आहे. त्यासाठी आम्ही उत्कृष्ट दर्जाचे उत्पादने आणि सेवा त्यांना प्रदान करू.’