‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे ठाण्यात दुसरे दालन सुरू…

ठाणे:१९२ वर्षांचा समृद्ध वारसा असलेले, विश्वास, कटिबद्धता आणि महाराष्ट्रीय संस्कृती समृद्ध करणाऱ्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे ठाणे येथे दुसरे भव्य दालन सुरू करण्यात आले आहे. या भव्य दालनाचे उद्घाटन अभिनेता रणदीप हुडा यांच्या हस्ते करण्यात आले.

ठाणे येथे असलेले ३३०० चौ. फुटांचे हे भव्य दालन ग्राहकांना उत्कृष्ट सोने, चांदी, नैसर्गिक हिरे आणि प्लॅटिनममधील अंगठ्या, कानातले, अप्रतिम ब्रेसलेटपासून ते वधूच्या दागिन्यांपर्यंत अनेक श्रेणींमधील उत्पादने प्रदान करते. ग्राहकांच्या मागणीला प्रतिसाद देत, ‘पीएनजी ज्वेलर्स’ने ठाणे शहरातील लोकांसाठी सोयीस्कर अशा ठिकाणी हे नवीन दालन उत्कृष्ट ग्राहक सेवेसह सुरू केले आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोड हे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, मॉल्स आणि स्टँडअलोन स्टोअर्सच्या कनेक्टिव्हिटीसह वास्तुशिल्पाच्या उत्कृष्ट कलाकृतींनी वेढलेले व विस्तारणारे निवासी केंद्र आहे. हे तरुण व्यावसायिक आणि कुटुंबांसाठी पसंतीचे स्थान आहे जे शहराला आधुनिकता आणि कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचे परिपूर्ण मिश्रण देते.

‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, ‘आमच्या ग्राहकांच्या उदंड प्रतिसादामुळे ठाण्यात आमचे दुसरे दालन सुरू करत आहोत. ठाण्यातील हे दालन म्हणजे आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांच्या दागिन्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा तसेच आमच्या सर्वोत्कृष्ट डिझाईन्स ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रसंगी रणदीप हुडा आमच्यासोबत सामील झाल्याने आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.’

अभिनेता रणदीप हुडा म्हणाले की, ‘भारतीय संस्कृती जपणाऱ्या तसेच भारत आणि जागतिक स्तरावर आपले कार्यक्षेत्र विस्तारत मूल्यांशी जोडून राहणाऱ्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ या ब्रँडशी जोडल्याचा मला आनंद आहे. सांस्कृतिक मूल्ये आणि ग्राहकांप्रतीचे प्रेम आणि आदर हे ब्रॅण्डच्या ग्राहक केंद्रित धोरणामध्ये दिसून येते. समृद्ध वारसा असलेल्या या ब्रॅण्डच्या प्रवासात सामील होणे हे माझ्यासाठी आनंदायी आहे.

या नवीन दालनाचा भाग म्हणून ‘पीएनजी ज्वेलर्स’ आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर घेऊन आले आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर अनुक्रमे २० आणि १०० टक्क्यांची सवलत मिळणार आहे. ही ऑफर २३ जून ते ८ जुलै २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे तसेच उत्सवकाळातही ग्राहकांना खरेदीचा उत्तम अनुभव घेता येणार आहे.