पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बौद्ध धम्म परिषदेचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंसमवेत बौद्ध भिक्खुंनी दिले निमंत्रण

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बौद्ध धम्म परिषदेचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंसमवेत बौद्ध भिक्खुंनी निमंत्रण दिले.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पुढाकारातुन अखिल भारतीय भिख्खु संघाच्या बौध्द भिख्खुंनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बौध्द भिख्खुंची भेट घडवून दिली. येत्या फेब्रुवारीमध्ये दिल्लीत अखिल भारत भिक्खू संघाच्या विज्ञान भवन येथे आयोजित बौद्ध धम्म परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण पुज्य भिख्खु संघाने दिले. यावेळी झालेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूज्य बौध्द भिख्खु संघ आपल्या भेटीला आल्याबद्दल अत्यंत आभार मानले.

अखिल भारतीय बौध्द भिक्खू संघाच्या शिष्टमंडळामध्ये पुज्य भदंत करुणानंद महाथेरो, पुज्य भदंत डॉ.राहुलबोधी महाथेरो, पुज्य भिख्खु नंद विवेचन आणि पुज्य भदंत प्रज्ञादिप या भिख्खु संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले,उपासक आर के आनंद उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना संविधान ग्रंथ भेट दिला.