संसदरत्न पुरस्कार २०२३ लोकसभा खासदार गोपाळ शेट्टी यांना प्रदान !

दिल्ली : हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्या हस्ते उत्तर मुंबई लोकसभा खासदार गोपाळ शेट्टी यांना संसदरत्न पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे संसदरत्न पुरस्कार २०२३ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.