‘संगीत अवघा रंग एकचि झाला’ नव्याने रंगभूमीवर…

मुंबई:देश आणि परदेशात यापूर्वी ४५० प्रयोग रंगवलेले ‘संगीत अवघा रंग एकचि झाला’ हे लोकप्रिय नाटक आता नव्याने रंगभूमीवर आले आहे. या नाटकात प्रमोद पवार, ओमकार प्रभुघाटे, अपर्णा अपराजित, गौरी सुखटणकर, गौतम मुर्डेश्वर व श्रद्धा वैद्य हे कलाकार भूमिका रंगवत आहेत.

‘आत्मन’ व ‘सिद्धीदाता प्रॉडक्शन्स’ निर्मित आणि ‘भूमिका थिएटर्स’ प्रकाशित हे नाटक आता रंगभूमीवर आले असून या नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन डॉ. मीना नेरुरकर यांनी केले आहे. रघुनंदन पणशीकर यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. केदार भागवत (ऑर्गन) आहे सुहास चितळे (तबला) यांची संगीतसाथ या नाटकाला आहे. डॉ. मीना नेरुरकर आणि प्रा. अशोक बागवे यांनी नाटकासाठी गीतलेखन केले आहे. या नाटकाला संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य आणि शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना लाभली आहे.