डेंटल केअर स्टार्टअप स्माईल्स.एआय बनले ‘डेझी’

मुंबई : डेंटल केअर उद्योगातील प्रिमिअम स्पेशालिस्ट म्हणून आपली उपस्थिती प्रबळ केलेली डेंटल हेल्थ सोल्यूशन्स स्टार्ट-अप स्माईल्स.एआयने ३०० क्लिनिक्स सुरू करण्याच्या आणि आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत ३०० कोटी रूपयांचा वार्षिक महसूल संपादित करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेसह स्वत:चे नाव डेझी म्हणून रिब्रॅण्ड केले आहे. या रिब्रॅण्डिंगमधून डी२सी ब्रॅण्डची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वोत्तम डेंटल आरोग्य सेवा देण्याप्रती कटिबद्धता दिसून येते, ज्यामधून रूग्णांना घरपोच पारदर्शकता आणि सुलभ उपचाराची खात्री मिळेल.

डेझी हा वैशिष्ट्यपूर्ण स्पेशालिस्ट ब्रॅण्ड अत्याधुनिक स्मार्ट तंत्रज्ञानाशी मानवी कौशल्याला एकत्रित करत उपचार, कॉस्मेटिक आणि प्रतिबंधात्मक उपचारामध्ये निपुण आहे. निदान, कोर्स व उपचाराचा कालावधी या डेंटल केअर प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक सुस्पष्टता देण्याचा, तसेच ग्राहकांना कोणतेही अचंबित करणारे मेडिकल बिल्स टाळत त्यांच्या वैद्यकीय खर्चांचे सर्वोत्तमपणे नियोजन करण्यामध्ये मदत करण्यासाठी किंमतीत पादर्शकता देण्याचा ब्रॅण्डचा मनसुबा आहे.

डेझीच्या ब्रॅण्ड अ‍ॅण्ड ग्रोथचे संस्थापकीय सहयोगी प्रशांथा वदन म्हणाले, ‘जवळपास प्रत्येक शहरामध्ये कीवर्ड ‘स्माइल’ असलेले डेंटल क्लिनिक आहे. इतरांपेक्षा आमच्या ब्रॅण्डला वरचढ ठरवण्यासाठी आम्हीक डेझी नावाचा अवलंब करण्याचा ठरवले. आमच्याकडे अनेक पर्याय आले, पण डेझी नावाव्यतिरिक्त इतर कोणतेही नाव आमचे लक्ष वेधून घेऊ शकले नाही. स्माईल्स.एआय कडून डेझीमध्ये बदल आमच्यासाठी आव्हानात्मक होते. आमच्या उद्यमासाठी ते भावी स्वाभाविक बदल होते. तसेच आम्ही आमच्या स्माईल्स.एआय क्लायण्टवर्गाच्या गरजांची देखील पूर्तता करत राहू.’

डेंटल केअर स्टार्टअपने कार्यक्षमतेमध्ये उच्च असलेली डेंटल केअर सुलभपणे उपलब्ध करून देण्याकरिता अनेक महिन्यांच्या विचारविनिमयानंतर डेझी नावाचा अधिकृतरित्या अवलंब केला आहे. स्माईल्स.एआय पासून लक्षणीय बदल करत नवीन ब्रॅण्ड नाव विभागातील इतरांपेक्षा वरचढ आहे, ज्यामधून आधुनिक, नवोन्मेष्कारी डेंटल केअर प्रदाता म्हणून ब्रॅण्डची उत्क्रांती दिसून येते. ब्रॅण्ड दर्जात्मक उपचाराची खात्री देणाऱ्या पात्र स्पेशालिस्ट्स आणि उच्च दर्जाच्या डेण्टिस्ट्रीच्या माध्यमातून अचूक डेण्टिस्ट्रीच्या खात्रीसाठी विज्ञानाशी संलग्न उत्पादने आणि सेवा देतो. डेझी डेंटल केअरसंदर्भातील भिती व गैरसमज दूर करते, ज्यामुळे ब्रॅण्डवरील विश्वास अधिक प्रबळ होण्यास मदत होते.