मुंबई:दक्षिण आफ्रिकेचे माजी खासदार जॉन स्टीन हुसेन (John Steen Huisen) त्यांच्या परिवारासोबत नाशिकच्या एका युवकाची मुंबई येथे ताज हॉटेलमध्ये नियोजित भेट झाली. तो युवक दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या सगळ्यांना परिचित असलेले डॉ. शिवप्रसाद महाले. या भेटीमध्ये मुख्यतः दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या निवडणूकीबद्दल मुद्देसुद चर्चा झाली. तसेच इतर अति महत्वाचे विषय म्हणजेच दक्षिण आफ्रिकामधील लोकांची मानसिकता आणि तेथील शेतकरी उद्योजक यांच्या समस्या यावर सविस्तर चर्चा झाली.
तसेच प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीचे स्व:त्वाचे, आंतरिक मनोबल वाढवणे ही कलियुगातील काळाची गरज आहे असा सगळ्यात महत्वाचा आणि गरजेचा मुद्दा डॉ. शिवप्रसाद महाले यांनी त्यांना स्पष्ट केला. तसेच आज विश्वामध्ये अनेक समस्या आहेत जशा कि कौटुंबिक समस्या (फॅमिली प्रॉब्लेम्स) , तरुणांच्या समस्या (युथ प्रॉब्लेम) , लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट, इत्यादी आणि यामुळे प्रत्येकाची मानसिक स्थिती अत्यंत खालावत चालली आहे, ही मानसिक स्थिती जर ठीक करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये ऊर्जा भरणे गरजेचे आहे. याची सुद्धा त्यांना खोलवर जाणीव करून दिली आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्व:त्वावर, आपल्या मनमंदिरावर म्हणजेच आंतरिक जगावर काम केले कि बाहेरील जगावर अधिपत्य गाजवणे सहज शक्य होते, बाहेरील जग आपोआप आपल्याशी जुळून येते. तसेच जेव्हा एखादा व्यक्ती मानसिकरित्या रिचार्ज होतो तेव्हाच तो त्याच्या स्वतःच्या क्षेत्रामधील सर्व समस्यांमधून (प्रॉब्लेम) खऱ्याअर्थाने डिस्चार्ज होतो . आणि अशा मानसिक, आंतरिकदृष्ट्या एका सक्षम व्यक्तीमुळेच त्याचे संपूर्ण कुटुंब, त्याच्या कुटुंबामुळे संपूर्ण समाज (सोसायटी), समाजामुळे (सोसायटी) शहर अशारितीने संपूर्ण एक मतदारसंघ रिचार्ज होतो , सक्षम होतो जो त्यांच्या लोकप्रतिनिधीला योग्यरित्या निवडून देण्यातही समर्थ असतो, इतक्या साध्या-सरळ परंतु गहन विषयावर त्यांनी खूप सोप्या आणि स्वतःच्या शैलीत मार्गदर्शन केलं. या सर्व सखोल चर्चेअंती अनेक प्रश्नांचे अतिशय विलक्षण पद्धतीने निवारण झाल्याने प्रभावित होऊन दक्षिण आफ्रिका देशाच्या विविध मतदार संघातील लोकांना रिचार्ज करण्याचा मानस डॉ. शिवप्रसाद महाले यांच्याकडे या दक्षिण आफ्रिकेचे माजी खासदार जॉन स्टीन हुसेन यांनी व्यक्त केला.
डॉ. शिवप्रसाद महाले यांचा अल्प परिचय… डॉ. शिवप्रसाद महाले, हे राज्यपाल पुरस्कृत India’s Leading Spiritual Surgeon, Aspiring Life Coach, Inspirational Speaker, आणि शिव’ज् इग्निटेडचे संस्थापक, समाजासाठी बहुमूल्य योगदान देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी ओळखले गेले आहे. वयाच्या फक्त ३४ व्या वर्षी समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ आणि नेहमीच समाजाला त्यांच्या विविध माध्यमातून/ उपक्रमातून जागृत करण्याचा त्यांचा मानस – त्यांची धडपड हि खरोखरच उल्लेखनीय आहे म्हणूनच त्यांनी जगभर खूप मोठी उंची गाठली असून राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय स्थरावर सर्वथा त्यांचे कौतुक होत आहे.
डॉ. शिवप्रसाद महाले यांचा सध्याचा गाजत असलेला अद्वितीय असा उपक्रम “शिवयान” जो राष्ट्रीय स्तरावरती संपूर्ण भारतभर राबवला जातोय तो लवकरच दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या स्तरावर राबवला गेला तर काहीच विशेष नाही वाटणार. शिवयान उपक्रमाला अशापद्धतीने भारताबाहेर मोठया प्रमाणावर मागणी वाढत आहे, तरीही त्यांनी आपल्या भारत देशाला सर्वप्रथम प्राधान्य दिले आहे त्याचे मुख्य स्रोत आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी, ज्याला समोर ठेवून डॉ. शिवप्रसाद महाले यांना नवीन भारत साकारायचा आहे जी काळाची गरजही आहे आणि असा भारत साकारण्यासाठी युवापिढीला योग्यतो आकार देणे गरजेचे आहे. म्हणूनच आपल्या भारतातील प्रत्येक व्यक्तीला नवी ऊर्जा – नवं शक्तीने रिचार्ज करून त्यांना आयुष्य जगण्याचा नवीन मार्ग दाखवणे यासाठी डॉ. शिवप्रसाद महाले हे सातत्याने प्रयत्नशील असतात, त्यांचा “शिवयान” हा राष्ट्रीय उपक्रम आपल्या आयुष्यातील, जीवनातील आनंदाचा पासवर्ड नक्कीच ठरू शकतो यात काही दुमत नाही.