नापासांची नाट्यशाळा

नाटक सकारात्मक परिणाम करते…- प्रा.देवदत्त पाठक

पुणे : अपयश कोणालाही निराश करतेच, त्यातून शालेय वयात येणारा नापासाचा शिक्का प्रचंड दडपण निर्माण करतो. अशावेळी या मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रा. देवदत्त पाठक यांच्या संशोधनातून नाट्य कला आणि तिचे रंगमंचीय खेळ उपयोगात येत आहेत…

नववी आणि दहावीत नापास झालेले, १७ नंबरचा एसएससीचा फॉर्म भरलेले, खूप चांगल्या गुणांनी पास झाले. दहावी नापासासांठी नाटकाचा तास आत्मविश्वास, एकाग्रता, आव्हान पेलण्याची क्षमता वाढवत आहे, गेल्या ३ वर्षातल्या श्री क्लासेस च्या बॅचेसचा १००टक्के निकाल लागला आहे, बाल गुन्हेगार यांचे वर्तन सुधारलेय, निसर्ग शाळेतील अनाथ आणि उपेक्षित मुले आज महाविद्यालयामध्ये जात आहेत,यात प्रा. देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांच्या नाटकाच्या तासाचा अनमोल वाटा आहे, असे संचालक नितिन ढमाले, सतीश मून, अजय पाटील असे अनेक संस्था चालक म्हणतात.

नाटकाचा तास शिक्षण आनंददायी करततोच, त्याच बरोबर सकारात्मक ऊर्जा ही निर्माण करतो असे साहिल शेटे, प्रथमेश शिरतोडे, सुनिता चव्हाणसह असंख्य मुलांनी सांगितले. रंजन , प्रबोधन, विकासन याबरोबर शिक्षणातली ही आव्हाने पेलण्यासाठी दहावी नापास, रस्त्यावरची मुले, बाल गुन्हेगार यांना सक्षम बनवण्यासाठी रंगमंचीय खेळ वरदान ठरत आहेत, याचा प्रत्येक शिक्षण संस्थेने पाठपुरावा करावा असे देवदत्त पाठक यांनी आवाहन केले आहे.

गुफान(पुणे), निसर्ग शाळा (लोणावळा), श्री क्लासेस, सिग्नल शाळा, बाल गुन्हेगार समुपदेशन केंद्र या संस्थांच्या मदतीने प्रा. देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर, नेहा कुलकर्णी,सीमा जोगदनकर कार्यरत आहेत.हरलेल्यानां प्रेरीत करण्यासाठी अशा कार्यशाळा १०वर्षांपासून घेतल्या जात आहेत. दहावी नापासांचे भविष्य यां मुळे घडते आहे.