‘स्नेह दीप ट्रस्ट’ने विशेष मुलांसोबत साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन’!

मुंबई:दरवर्षी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन ३ डिसेंबरला साजरा केला जातो. पवईत निराली ए एम नाईक चॅरिटेबल हेल्थ केअर फॅसिलिटी येथे स्नेह दीप ट्रस्टने ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन’ हा ९ डिसेंबर २०२३ ला दिव्यांग मुलांसह आणि पालकांसोबत साजरा केला. स्नेह दीप ट्रस्टची स्थापना सात तरुण डॉक्टरांनी केली. स्नेह दीप ट्रस्ट विशेष मुलांची दैनंदिन काळजी घेण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला. स्नेह दीप ट्रस्ट डॉक्टर्स आणि रुग्णालयाच्या विस्तृत नेटवर्कच्या मदतीने मुलांना पोषण, शिक्षण आणि अपंगत्वावरील उपचार देत आहे. भारतात स्नेह दीप ट्रस्ट भागीदार आणि प्रायोजकांच्या मदतीने सर्वात दुर्गम भागापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो.

● स्नेह दीप ट्रस्टची कार्ये :

● डायलिसिससाठी सीआरएफच्या रुग्णांना मदत
● पॅराप्लेजिक फाऊंडेशनमध्ये पॅराप्लेजिक रुग्णांना कॅलिपर
● हृदयविकार शस्त्रक्रिया
● रुग्णांना किरकोळ शस्त्रक्रियांसाठी मदत
● घरकुल ट्रस्ट, सांताक्रूझ संचलित डे केअर सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या निराधार विशेष मुले/दिव्यांग महानगरपालिका शाळेतील मुलांना आहार
● मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
● क्वाड्रिप्लेजिकसाठी वॉटर बेड आणि बेडसोर्सच्या उपचारासाठी मदत
● वार्षिक नेत्र शिबिरात सहभागी होणाऱ्या गरिबांना चष्मे
● गुरुप्रसाद ट्रस्ट, रत्नागिरीमार्फत एड्स उपचार
● अंधेरी येथे जुन्या कपड्यांची विक्री करून गुजरातमधील २६ जानेवारी २००१ च्या भूकंपात बळी पडलेल्या २५ कुटुंबांना साहित्य पाठवण्याची मदत

● विशेष मुलांसाठी केंद्र(Centre For Special Children)

सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रनला (CSC) या वर्षी १ सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण झाले. त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मुंबईतील एका खाजगी धर्मादाय रुग्णालयातून चालवलेले हे पहिले विशेष मुलांसाठी केंद्र आहे. केंद्राकडे ११७ मुले आधारासाठी असून केंद्राने मुलांचे समुपदेशन केले आहे, पालकांना मार्गदर्शन केले आहे आणि यापैकी अनेकांना उपचार आणि तपासणीसाठी संस्थांकडे पाठवले आहे. मुलांना चांगले वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी केंद्राने ९ संस्थांसोबत सहकार्य केले आहे.स्नेह दीप ट्रस्टच्या निधीतून फिजिओथेरपी, व्हिज्युअल, एड्स, स्पीच थेरपी, श्रवण यंत्र आणि निदान, चाचण्या देऊन केंद्राने २९ मुलांना आधार दिला आहे. निरालीच्या भक्कम पाठिंब्याने एएम नाईक चॅरिटेबल हेल्थकेअर फॅसिलिटी, सीएससी पवईच्या आसपासच्या मुलांसाठी वरदान ठरली आहे.