विद्या विकास मंडळाच्या प्रांगणात रंगला चिमुकल्यांचा आषाढी वारी सोहळा !

मुंबई:विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष. जाहला संगे चिमुकले निघाले, पंढरीच्या वारीला… विद्या विकास मंडळाच्या प्रांगणात शिशुकुल आणि प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा आयोजित केला होता.यावेळी छोट्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोषाख परिधान केले होते.विठ्ठल रखुमाई,वारकऱ्यांची वेशभूषा करून हातात टाळ, गळ्यात माळा घालून डोक्यावर तुळशी वृंदावन आणि खांद्यावर पालखी घेऊन विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष करीत विद्यार्थ्यांनी दंग होऊन वारीची अनुभूती घेतली.यावेळी मुलांनी रिंगण घालून विठ्ठलाच्या गाण्याचा आनंद लुटला.

मागील अनेक वर्षांपासून दिंडीची ही परंपरा सुरु आहे. विद्यार्थ्यांना सुसंस्कारित शिक्षण देण्याचे विद्या विकास मंडळ संस्थेचे ध्येय आहे , मागील साडेसहा दशकांपासून संस्थेने ते जपले आहे.