जुहूच्या विद्यानिधी विद्यालयात १ ते १५ जुलै दरम्यान साजरा झाला स्वच्छता पंधरवडा !

मुंबई : १ जुलै ते १५ जुलै २०२३ दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत बीपीसीएल अंतर्गत सक्षम संस्था आणि उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्रजलाल पारेख हायस्कूल मराठी माध्यम यांच्यातर्फे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, गटचर्चा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आणि स्वच्छता फेरी आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेत उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्रजलाल पारेख शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी सक्षम संस्थेचे राज्य समन्वयक मनोहर अनभोरे यांच्याकडून विजेत्यांना विशेष पारितोषिकाने गौरविण्यात आले.त्यांनी स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि स्वच्छतेचा पुरस्कार करण्याचे आवाहन केले.

यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांकडून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. याप्रसंगी उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी कोषाध्यक्ष दामले यांनी स्वच्छता ही केवळ एक दिवसापूर्वी मर्यादित न राहता जीवन प्रणाली असली पाहिजे,असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.