‘पिरेम’ चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर…

मुंबई : प्रेम हा केवळ शब्द नसून ती एक भावना आहे. प्रत्येक माणसाच्या मनात ही भावना हळुवार येऊन वेड लाऊन जाते. अशाच प्रेमात वेड्या झालेल्या प्रेम पाखरांची हृदयद्रावक नवी गोष्ट ‘पिरेम’ रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.’पिरेम’ चित्रपटाचा ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ १६ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर झाला आहे.

‘पिरेम’ या चित्रपटात प्रेक्षकांना एक नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. विश्वजित पाटील आणि दिव्या सुभाष यांचं खास पदार्पण असून चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप लायकर यांनी केले आहे. ही कथा एक गरीब घरातल्या मुलाची आहे. ज्याला दहावीनंतर उच्च शिक्षण मिळवण्यासाठी शहरातल्या कॉलेजमध्ये जावं लागतं. तिथे तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. प्रेमात आंधळा होऊन आपल्या मोलमजुरी करणाऱ्या आईकडून आगाऊ पैसे घेऊन खर्च करतो. एक असं वळण येतं जिथे त्याचं आयुष्य अचानक गटांगळ्या घेऊ लागतं. नेमकं त्याच्या आयुष्यात पुढे काय घडतं हे चित्रपटातून कळणार आहे.

‘प्रेक्षकांच्या नव्या विचारांसोबत नव्या आवडीनुसार आम्ही नव्या कल्पना आमच्या चित्रपटांतून सातत्याने सादर करत असतो. ‘पिरेम’ हा चित्रपट आजच्या तरुणांसोबतच सर्व वयोगटाच्या पसंतीस पडेल आणि सहकुटुंब या चित्रपटाचा आस्वाद घेतील अशी खात्री आहे.’ असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.