केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केबल ऑपरेटर्सच्या मागण्यांसंदर्भात निवेदन सादर !

मुंबई : दिल्ली येथे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शिव केबल सेना अध्यक्ष विनय उर्फ राजू पाटील आणि डिजिटल सव्हिर्स प्रोव्हायडर फेडरेशन पॅन इंडिया ऑल केबल ऑपरेटर यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर केबल ऑपरेटर लायसेन्स सिस्टिम तसेच आर्थिक सहाय्यक योजना अशा विविध महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन पत्र दिले. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच यासोबतच संयुक्त सचिवांना हि हे निवेदन देण्यात आले.