मुंबई : मुंबईमध्ये एनएसडीएलने एसबीआय फाउंडेशनच्या सहकार्याने एसबीआय कॉर्पोरेट सेंटरला फिरते वैद्यकीय युनिट-संजीवनी सुरू केले आहे. संजीवनी हे सर्वात वंचित समुदायांना प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, संदर्भ आणि निदानात्मक आरोग्य सेवा प्रदान करणारे क्लिनिक आहे. ‘डॉक्टर्स फॉर यू’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून संजीवनी हा प्रकल्प राबविला जात आहे.
या मोबाईल मेडिकल युनिट्सद्वारे, एनएसडीएलचे उद्दिष्ट मुंबई (महाराष्ट्र), बक्सा (आसाम) आणि हरदोई (उत्तर प्रदेश) या तीन ठिकाणी गरजू समुदायांना प्राथमिक आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. मुंबईतील प्रोजेक्टचा उद्देश धारावी, गोवंडी, सायन आणि कुर्ला इत्यादी शहरी झोपडपट्ट्यांमध्ये गरजू लोकांना त्यांच्या घरोघरी जाऊन निदान आणि उपचारात्मक आरोग्य सेवा प्रदान करणार आहेत. नीति आयोगाने अधिसूचित केलेल्या हरदोई आणि बक्सा या महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प ग्रामीण तसेच आदिवासी भागात आरोग्य सेवा प्रदान करेल. प्रत्येक युनिट प्रत्येक ठिकाणी अंदाजे २०,००० लाभार्थ्यांना सेवा देण्यासाठी सुसज्ज आहे. एकूण तीनही ठिकाणी वर्षभरात सुमारे ६०,००० लाभार्थ्यांना सेवा देण्याची तरतूद आहे.
एनएसडीएलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पद्मजा चुंदुरू म्हणाल्या, ‘एनएसडीएलला या संजीवनी उपक्रमासाठी एसबीआयसारख्या प्रतिष्ठित संस्थेशी जोडल्याचा अभिमान वाटतो. हा प्रकल्प केवळ ग्रामीण जनतेला प्रथमोपचाराबरोबर भारतातील दुर्गम खेड्यांमध्ये आरोग्य सुधारेल. ग्रामीण आणि दुर्गम समुदायांना सेवा देण्यासाठी या प्रकल्पाचा देशातील इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विस्तार करण्याचे एनएसडीएलचे उद्दिष्ट आहे.प्रकल्प संजीवनी, असा प्रकल्प आहे जिथे आरोग्य सेवा पोहचु शकत नाही अशा भागात प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणार आहोत, हे आमच्या सीएसआर प्रयत्नांमधील एक महत्त्वाचे आहे.’
एसबीआय फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय प्रकाश म्हणाले की, ‘मला अशा ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणाऱ्या प्रकल्पामुळे आनंद होत आहे. एनएसडीएलने धोरणात्मकदृष्ट्या ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी प्रकल्प राबविण्यासाठी आमच्याशी हातमिळवणी केली आहे.’