तंत्रज्ञानामध्ये अनपेक्षित प्रगती झाल्यामुळे व्यापार आणि गुंतवणूक करणे कार्यक्षम आणि अत्याधुनिक बनले आहे. डिजिटलायझेशनमुळे अनेक गुंतवणूक संधी निर्माण झाल्या आहेत, तसेच ट्रेडिंग अॅपवर ऑनबोर्ड होणे आणि गुंतवणूकीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. पण यासोबत फसवणूक होण्याची शक्यता देखील वाढली आहे. फसवणूकीशी लढण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे अशा प्रकारच्या जोखीमांची माहिती देत वैयक्तिक गुंतवणूकदारांना सक्षम करणे. ब्रोकरेज क्षेत्रातील फिनटेक कंपन्या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ज्यामधून गुंतवणूक प्रक्रिया अधिक सुरक्षित असण्याची आणि सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी होत असल्याची खात्री मिळते. फिनटेक कंपन्या कशाप्रकारे घोटाळेबाजांच्या पुढे राहत आहेत आणि गुंतवणूकदारांना सक्षम करत आहेत याबद्दल माहिती देत आहेत, एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी.
● घोटाळेबाजांचा सामना करण्याफसाठी गुंतवणूकदारांमध्ये जागरूकतेचा प्रसार :
– फिनटेक कंपन्या सामान्य फसवणूक आणि नियामकांची भूमिका (जसे सेबी, आयआरडीए इत्यादी) याबाबत मुलभूत माहिती देण्यासाठी व्यापक उपक्रम राबवतात. ज्याामुळे कोणतीही फसवणूक आधीच ओळखता येते. लहान व्हिडिओ, ईमेलर्स, वेबिनार्स आणि सोशल मीडिया पोस्ट्सी अशा आधुनिक साधनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना बाजारपेठेतील प्रचलित घोटाळे आणि फसवणूक पद्धतींबाबत जागरूक केले जात आहे. एआय-आधारित चॅटबोट्सनी युजर परस्पर संवादामध्ये अधिक सुधारणा केली आहे, ज्याामुळे गुंतवणूकदारांना विशिष्ट अनपेक्षित संदेश किंवा ईमेल्स बाबत शंका असल्याकस व्हॉट्स अॅप किंवा इतर कोणत्याही सक्षम मेसेजिंग अॅप्लिनकेशनच्या माध्यंमातून ते प्रतिनिधीशी सुलभपणे संवाद साधू शकतात.
● तंत्रज्ञान-सक्षम साधने आहेत नवीन फ्रॉड बस्टलर्स (फसवणूकीचा पर्दाफाश करणारे) :
– एआय आणि एमएल, तसेच ब्लॉसकचेन अशा तंत्रज्ञानांमधील सुधारणांमुळे काही कंपन्यांना सिम्युसलेशन्स, क्विझेस् आणि अपडेट्स अशी विविध साधने विकसित करण्यामध्ये फायदा झाला आहे. माहितीबाबत (संभाव्य फसवणूक आणि जोखीमांबाबत) गेमिफिकेशन हे प्रबळ साधन आहे. सिम्युलेशन्स गुंतवणूकदारांना फसवणूक करणाऱ्यांची पद्धत आणि फसवणूक पद्धती ओळखण्यामध्येे मदत करतात.
● घोटाळा-मुक्त संपत्ती निर्मितीसाठी व्यापार सुरक्षित करणे :
– सुधारित सुरक्षितता उपाय राबवत आणि नियमित ऑडिट्स करत सिस्टम पायाभूत सुविधेमध्ये सुधारणा करण्यासह ब्रोकरेज कंपन्यांनी घोटाळेबाज आणि फसवणूक करणाऱ्यांच्याु एक पाऊल पुढे राहण्याासाठी प्रयत्न केला आहे. ट्रेडिंग व्याासपीठामध्ये प्रबळ सुरक्षितता उपाय असण्यासोबत ते अपडेट असण्याची खात्री घेतल्याने गुंतवणूकदारांचे अनेक फसवणूकींपासून संरक्षण होऊ शकते. तसेच वापरकर्त्यांना या सुरक्षितता वैशिष्ट्यांबाबत आणि त्यांचा प्रभावीपणे कसा वापर करावा याबाबत माहिती देणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
● फसवणूक करणाऱ्यांचे समूळ निर्मूलन करण्या्साठी प्रबळ रिपोर्टिंग:
– जोखीम व्यणवस्थापन आणि फ्रॉड-डिटेक्शन सिस्टमची क्षमता प्रबळ रिपोर्टिंग यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुधारता येऊ शकते. फिनटेक कंपन्यांपनी फ्रॉड रिपोर्टिंगची (फसवणूक केल्या बाबत माहितीचा रिपोर्ट) प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुलभ केली आहे. ट्रेडिंग अॅपचा वापर करण्या व्यतिरिक्त सोशल मीडिया, व्हॉपट्स अॅप आणि एआय-सक्षम सीआरएमच्या माध्यमातून कोणत्याही फसवणूक कृतींबाबत रिपोर्ट तयार करणे शक्य आहे. कोणतीही अनियमित किंवा संशयास्पमद कृती ओळखणाऱ्या आणि वापरकर्त्यांना त्याबाबत चेतावणी देणाऱ्या अत्याधुनिक साधनांचा (जसे एमएल) अवलंब करत डेटा शेअरिंग आणि सहयोगाची प्रक्रिया सुधारता येऊ शकते आणि काही केसेसमध्ये स्वयंचलित देखील करता येऊ शकते.
काही ब्रोकरेज कंपन्यांनी व्यवहारांची पारदर्शकता आणि ट्रेसेबिलिटी सुधारण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा देखील वापर केला आहे. ब्रोकरेज कंपन्यांनी अशा कोणत्याही फसवणूक प्रयत्नांना ओळखण्यासाठी आणि त्याबाबत रिपोर्ट देण्यासाठी नियामकांसोबत सहयोगाने अनुपालन प्रक्रिया सुधारत प्रतिसाद दिला आहे.
● गुंतवणूकदारास अनुकूल ब्रोकिंग क्षेत्राची निर्मिती:
– नियामक, ब्रोकिंग कंपन्या आणि इतर भागधारकांनी व्यक्तींना फसवणूकीबाबत रिपोर्ट करण्याकरिता माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी सहयोग केला पाहिजे. तसेच एआय-आधारित फ्रॉड डिटेक्शटन सिस्टम्ससारख्याा प्रगत तंत्रज्ञान सोल्यू्शन्सची अंमलबजावणी केल्यास फसवणूक करणाऱ्या कृती ओळखण्यास आणि त्यावर प्रतिबंध ठेवण्यास मदत होऊ शकते. सहयोगाने आपण फसवणूक पद्धतींना सहजपणे ओळखता आणि त्यावर प्रतिबंध ठेवता येईल असे भविष्य निर्माण करण्याप्रती काम करू शकतो, ज्याामधून सर्व गुंतवणूकदारांसाठी विश्वसनीय आणि सुरक्षित गुंतवणूक वातावरणाची खात्री मिळू शकते.
– प्रभाकर तिवारी
चीफ ग्रोथ ऑफिसर
एंजल वन लिमिटेड