जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी हक्क, न्याय व कृती या संकल्पनेवर देवदत्त पाठक यांची कार्यशाळा आणि नाटकाचा प्रयोग

पुणे: जागतिक महिला दिननिमित्त WWA प्रेरित महिलांसाठी हक्क (राइट्स), न्याय (जस्टीस) व कृती (ॲक्शन) या संकल्पनेवरची (थीम) देवदत्त पाठक यांची कार्यशाळा आणि देवदत्त पाठक लिखित आणि दिग्दर्शित नाटकाचा प्रयोग गुरुस्कूल गुफानने आयोजित केला. स्त्रीला नुसती सहानुभूतीची गरज नाही ,तर तिच्यातील कार्यक्षमता ओळखत तिच्या स्वतःच्या आयुष्यासाठी त्याचा पुरेपूर वापर व्हावा आणि त्यातून तिला तिचा हक्क, न्याय आणि प्रत्यक्ष जगण्यासाठी कृतिशील क्षमता प्राप्त व्हावी, या दृष्टीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने देवदत्त पाठक यांनी रंगमंचीय खेळांच्या माध्यमातून नाट्य कार्यशाळा घेतली . यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उषा किरण देशपांडे, नाट्यकला तज्ञ मिलिंद केळकर आणि कवयित्री व संगीतग तज्ञ गौरी बनसुडे उपस्थित होते.

आता फक्त विचार करणे आणि बोलणे नको तर त्यावरची त्वरित कृती व्हावी. यासाठी सर्व महिलांनी आणि संबंधित संस्था आणि व्यक्तींनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे अशा प्रकारचा सूर या निमित्ताने या कार्यशाळेत दिसून आला.

जागतिक महिला दिन साजरा या नाटकातून स्त्रीला भरभक्कम आधार हवा तर सहानुभूती नको. जर का तो वेळीच नाही मिळाला तर स्त्रीची होणारी कुचंबणा आणि विटंबना याला जबाबदार कोण? असा नाट्यसंवाद करण्यात आला. धनश्री गवस, गौरी बनसुडे,मल्हार बनसोडे या कलाकारांनी या नाटकातून स्त्रीच्या अस्तित्वाचा प्रश्न सगळ्यांसमोर आणला. मिलिंद केळकर यांनी प्रमुख साहित्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले तर दीपिका पाठक आणि ऋतुजा केळकर,अर्णव देशपांडे यांनी सूत्रधार व निर्मितीची जबाबदारी पार पाडली .