‘२४व्या झी सिने अवॉर्ड्स २०२६’मध्ये विकी कौशलच्या दमदार परफॉर्मन्समधून मराठा अभिमानाचा उत्सव
मुंबई: ‘झी’ टीव्हीने पुन्हा एकदा भारतीय सिनेमाचा भव्य उत्सव साजरा करत ‘२४वा ‘झी सिने अवॉर्ड्स २०२६’ रंगतदार पद्धतीने पार पाडला. या सोहळ्यात बॉलीवूड मधील स्टार्स, धमाकेदार परफॉर्मन्स आणि सिनेमावर प्रेम करणारे चाहते एकत्र आले. ‘FANtertainment’ या संकल्पनेला साजेसा हा सोहळा खऱ्या अर्थाने सिनेमाचा जल्लोष ठरला. या भव्य सोहोळ्यातील सर्वात खास क्षणांपैकी एक म्हणजे अभिनेता ‘विकी कौशल’ यांचा दमदार परफॉर्मन्स. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा ‘छावा’ म्हणजेच विकीने याच चित्रपटातील आपल्या लोकप्रिय भूमिकेला स्टेजवर जिवंत केले आणि प्रेक्षकांना थक्क केलं.
भारतीय सिनेमाच्या या भव्य सोहोळ्यात यंदा प्रेक्षकांना एक अत्यंत खास आणि अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळणार आहे. लोकप्रिय अभिनेता विकी कौशल महाराष्ट्राची परंपरा, शौर्य, आणि गौरवाला साजेसा एक भव्य परफॉर्मन्स सादर करताना महान मराठा योद्ध्यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करणार आहे.
महाराष्ट्राच्या शौर्यगाथांवर आधारित हा परफॉर्मन्स पारंपरिक शैलीत सादर केला जाणार आहे. या भव्य सादरीकरणाची सुरुवात विकीच्या दमदार एंट्रीने होईल. तो एका भव्य हत्तीवरून प्रेक्षकांमध्ये प्रवेश करणार असून, नाशिक ढोलाच्या गजरात आणि भगव्या झेंड्यांच्या लाटांमध्ये हा जल्लोषमय मिरवणुकीचा माहोल तयार होईल.
मराठा संस्कृती, परंपरा आणि शौर्य याचा अभिमान जागवणारा हा भव्य परफॉर्मन्स प्रेक्षकांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
अशा अनेक अविस्मरणीय क्षणांनी सजलेला ‘२४वा झी सिने अवॉर्ड्स २०२६’ पाहायला विसरू नका , रविवार, १५ मार्च, सायंकाळी ७: ३० वाजता, फक्त आपल्या झी सिनेमा, झी टीव्ही आणि झी५ वर.