मुंबई : उपनगर शिक्षण मंडळ संचलित श्री सिद्धिविनायक विद्यानिधी शिशु मंदिर शाळेच्या सभागृहात दिनांक १० सप्टेंबरला मायकल मॅन इंडिया कंपनीचे प्रमुख शैलेश नेमा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते शाळेतील २५६ विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा ,पाण्याची बाटली व फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री यांनी केले .या शाळेतील विविध विद्यार्थी प्रिय उपक्रम पाहून मी भारावून गेलो आहे, अशी प्रक्रिया शैलेश नेवा यांनी व्यक्त केली. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले तसेच लाठीकाठी, मल्लखांब, दोर मल्लखांब यांची प्रात्यक्षिके सादर केली.शालेय संकुलात देवघरात अर्पण केल्या जाणाऱ्या फुलांपासून निर्माल्यशक्ती हे सेंद्रिय खत तयार केले जाते .या प्रकल्पाला भेट देऊन मायकल मॅन इंडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी श्रमदान केले.
शाळेतील अटल लॅबला भेट देऊन राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेल्या प्रकल्पाचे व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपस्थितांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक संतोष टक्के यांनी मानले.कार्यक्रमाची निवेदन कुमार अथर्व गवस्कर व पूर्वा सत्वे यांनी केले.