उत्तर मुंबईत भाजप महायुतीतर्फे ‘लोकतंत्र बचावो,अराजकता हटाओ’ अभियान पदयात्रेचे आयोजन

मुंबई: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात उत्तर मुंबईत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष महायुतीतर्फे ‘लोकतंत्र बचावो,अराजकता हटाओ’अभियान पदयात्रेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींविषयी काँग्रेस नेते अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अभद्र भाषा केली आहे. खोटे नरेटिव्ह पसरवणे, कधी ईव्हीएम तर कधी मत चोरी तर कधी संविधान धोक्यात, परीक्षा पेपर फुटी असे अनेक बिनबुडाचे आरोप करून जनतेला भ्रमित करणे देशातील शांतता बिघडवणे आंदोलन करून सरकाला बदनाम करण्याचे अतोनात प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानिमित्त आज उत्तर मुंबई भाजप महायुतीतर्फे पदयात्रेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेद्वारे विरोधकांचा निषेध करण्यात आला. यावेळी आमदार संजय उपाध्याय, आमदार प्रविण दरेकर, आमदार योगेश सागर,आमदार मनिषा चौधरी, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रकाश सुर्वे, महानगरपालिका सभागृह नेते नगरसेवक गणेश खणकर, नगरसेवक दिपक (बाळा) तावडे, माजी खासदार गोपाळ शेट्टी, रिपब्लिकन पक्षाचे रमेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते इंद्रपाल सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

‘लोकतंत्र बचावो,अराजकता हटाओ’अभियान पदयात्रेची सुरुवात बोरीवली स्वामी विवेकानंद पुतळा गोरागांधी ते कांदिवलीच्या महावीर नगर सप्ताह मैदानाच्या सभेत समारोप करण्यात आला. पदयात्रेत विधीज्ञ (वकील), डॉक्टर, विद्यार्थी-महिला संघटना, सामाजिक-स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर आम्ही अराजकता पसरू देणार नाही. मतदान सूची – एसआयआर संबंधित विरोधकांना प्रश्न केले की आपण आपल्या देशात अनैतिक रित्या राहणाऱ्या लोकांना का सहन करायचे ? एक एक माणूस तीन तीन ठिकाणी मतदान राहूच शकत नाही. देशाची जनता मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधीना अपशब्द बोलल्याबद्दल कधीच माफ करणार नाही. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, संविधानवर जेव्हा आरोप करतात तेव्हा दिसून येत आहे की काँग्रेस नेते राहुल गांधी बिथरले आहे. सर्व नेते दिशाहीन आणि नेतृत्वहीन झाले आहेत.’