मुंबई विद्यापीठात लोकशाहीवर सी२० गोलमेज चर्चा !

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रॅटिक लीडरशिप आणि बाल आपटे सेंटर फॉर स्टुडंट्स अँड युथ मूव्हमेंट्सच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठात लोकशाही वितरणावर सी २० क्षेत्रीय गोलमेज आयोजित करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाचे कुलपती प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सी२० प्रादेशिक गोलमेज ऑन डिलिव्हरिंग डेमोक्रसीचे आयोजन करण्यात आले. सी२० गोलमेजमध्ये प्र-कुलगुरू डॉ.अजय भामरे, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुनील भिरूड, भारतीय लोकशाही नेतृत्व संस्थेचे कोर्स संचालक देवेंद्र पै आदी उपस्थित होते. १५संघटनांचे एकूण २५ प्रतिनिधी चर्चेत सहभागी झाले होते. प्रतिनिधित्व केलेल्या इतर काही संस्थांमध्ये रोटरॅक्ट क्लब, प्रजा फाऊंडेशन, राष्ट्रीय मतदाता मंच, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नन्स आणि थिंक इंडिया यांचा समावेश आहे.

प्रादेशिक सी२० (सिव्हिल २०) जी२० च्या अधिकृत नागरी समाज प्रतिबद्धता मंचाचा भाग म्हणून होत असलेल्या चर्चा चर्चासत्रांचा एक भाग आहे. या गोलमेज संमेलनात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशातील नागरी समाजातील सर्व क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते आणि अनुभवी अभ्यासकांचा सहभाग दिसला आणि लोकशाही शासनासंबंधी विचारांच्या देवाणघेवाणीसाठी अंतर्दृष्टीपूर्ण चर्चा झाली.

प्रा. रवींद्र कुलकर्णी गोलमेज संमेलनाच्या उद्घघाटनाप्रसंगी बोलताना त्यांनी प्रतिनिधींना मुंबई विद्यापीठाच्या लोकशाही शासनव्यवस्थेला आकार देणाऱ्या महान वारशाची आठवण करून दिली. ‘याच खोलीत फेरोजशाह मेहता यांच्यासारख्या लोकशाही शासनाच्या उल्लेखनीय योगदानकर्त्यांनी अनेक बैठकांचे अध्यक्षपद भूषवले आहे.’

‘लोकशाहीचे वितरण करण्यावरील प्रादेशिक गोलमेज परिषदेचे उद्दिष्ट नवीन मतदारांमधील मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि स्थानिक स्वराज्यात नागरिकांचा सहभाग यासारख्या गंभीर विषयांवर लक्ष देणे आहे,’ असे भारतीय लोकशाही नेतृत्व संस्थेचे कोर्स संचालक देवेंद्र पै यांनी सांगितलं.

चर्चेदरम्यान लिटमस टेस्ट प्रोजेक्टच्या स्वराज शेट्टी यांनी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण शेअर केले की, ‘मुख्य आव्हान हे पहिल्यांदाच मतदार नसून, पहिल्याच मतदाराला दुसऱ्यांदा मतदान करणं हे आहे.’ लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा अधिक चांगला सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नागरिक शिक्षणाची प्रक्रिया शाळेपासून सुरू करण्याचे आवाहन ब्लूव्हिसलचे प्रतीक कनोडिया यांनी केले. लोकसत्ता चळवळीचे डॉ.केदार दिवाण यांनी चांगल्या शहरी स्थानिक प्रशासनासाठी क्षेत्रसभेच्या कल्पनेकडे मेळाव्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

लोकशाहीवरील सी२० वर्किंग ग्रुपचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. बसवराजू आर श्रेष्ठ म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींच्या इच्छेनुसार, जी२० चर्चा केवळ उच्चभ्रू सरकारी पातळीवर मर्यादित न ठेवता ती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, या गोलमेज चर्चा आयोजित केल्या आहेत. या चर्चेतून समोर येणारे विचारमंथन सी२० पॉलिसी पॅकमध्ये समाविष्ट केले जातील.