विद्यानिधी शाळेत ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

मुंबई: जुहू येथे उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्रजलाल पारेख हायस्कूल मराठी माध्यमिक विभाग मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अभिनेत्री स्मिता आपटे, उपनगर शिक्षण मंडळाचे मान्यवर, शाळेच्या मुख्याध्यापिका आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषा गौरव दिन इयत्ता सातवीच्या वर्गाने परिपाठाद्वारे सादर केला. पारंपारिक लेझिम नृत्याने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी सुविचार ,बोधकथा, नृत्य, मराठी भाषा गौरव गीत ,बोधकथा, मराठी साहित्याची दुनिया, प्रश्नमंजूषा इ. कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मराठी साहित्याच्या दुनियेतून विद्यार्थ्यांनी कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र इत्यादी विषयीची माहिती सादर केली. प्रश्नमंजूषेद्वारे विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराद्वारे मराठी भाषेतील महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या निवेदिका लेखिका अभिनेत्री असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या स्मिता आपटे होत्या. आपण सर्वांनीच मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी जास्तीत जास्त मराठी भाषा बोलण्याचा वाचण्याचा लिहिण्याचा संकल्प करूया असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.