मॅक्सहबने इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल्सची सादर केली एआय-सक्षम व्ही६ सिरीज

मुंबई: संवाद आणि सहयोग साधण्यात मदत करणारी उत्पादने, सेवासुविधा प्रदान करणारा, जगातील आघाडीचा ब्रँड मॅक्सहबने मुंबईमध्ये पाम एक्स्पोमध्ये आपल्या दोन नवीन एआय सक्षम इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल सिरीज व्ही६ ट्रान्सेन्ड आणि क्लासिक इंटरॅक्टिव्ह लॉन्च केली. मॅक्सहबने लॉन्च केलेली ही अतिशय आकर्षक आणि भविष्यासाठी उपयुक्त दृक-श्राव्य (एव्ही) उत्पादने अशा क्षमतांनी सुसज्ज आहेत ज्यामुळे कॉर्पोरेट आणि शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा मिळू शकेल.

दृक-श्राव्य (एव्ही) उद्योगक्षेत्रात दूरस्थ सहयोग, दर्शकांच्या मोठ्या संख्येसोबत कॉर्पोरेट संबंध, दूरस्थ शिक्षण आणि हायब्रिड कार्यप्रणालीसाठी तंत्रज्ञान स्वीकारण्यात सध्या खूप वाढ झाली आहे. व्ही६ सिरीज ५५, ६५, ७५ आणि ८६ या आकारांमध्ये उपलब्ध आहे. अखंडित कम्युनिकेशन आणि ग्राहक अनुभवासाठी अखंडित स्क्रीन शेयरिंग, प्रगत व्हाईटबोर्ड तंत्रज्ञान आणि शानदार दृक-श्राव्य कार्यक्षमता एकत्रित करणे मॅक्सहबचे नवे उद्दिष्ट आहे. इन-बिल्ट कॅमेरा, माईक आणि टच पॅनलसह ही सिरीज मीटिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पूर्ण करू शकते. यामध्ये प्रभावी गहिरे रंग आणि अँटी-ग्लेयर टेम्पर्ड ग्लास आहे ज्यामुळे ही स्क्रीन स्क्रॅच-फ्री बनली आहे.

कॉर्पोरेट बिझनेसचे हेड रोहित एके यांनी सांगितले, ‘ आधुनिक उद्योग वातावरणाच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेला प्रस्तुत करून आम्हाला खूप आनंद होत आहे. हे एआय-संचालित डिव्हाईस नवीन तंत्रज्ञानाचे प्रतीक आहे, जे सातत्याने बदलत्या कामाच्या सेटिंग्समध्ये सहायक ठरतील आणि कॉन्फरन्सेस आणि मिटिंग्सचा दर्जा उंचावतील. व्हीसीसाठी आवश्यक वैशिष्ट्ये आणि कार्यक्षम चर्चा सुविधा यांना एकत्र जोडून कुशल आणि प्रभावी संवादांच्या माध्यमातून हायब्रिड वर्किंग मोड अधिक कार्यक्षम व वेगवान केला जाऊ शकतो.’

प्रगत इंटरॅक्टिव्ह सोल्युशन्सची मागणी खूप वाढत आहे. सुविधाजनक, बुद्धिमान, कमी खर्चाच्या आणि लाभदायक कम्युनिकेशन अनुभव प्रदान करणारी उत्पादने ग्राहकांना हवी आहेत. लवचिक उत्पादने आणि हाय-टेक उत्पादने व सुविधांसह मॅक्सहबने एआय-सक्षम एलसीडी आणि एलईडी सिस्टिमच्या उत्पादनांमध्ये जागतिक स्तरावर आघाडीचे स्थान मिळवले आहे. सिस्टिम्स वायरलेस प्रोजेक्शन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बारसह मॅक्सहब ओएस ६.० सह देखील सहज उपलब्धता व सुविधाजनक कम्युनिकेशन अनुभव प्रदान करते.

ही उत्पादने सहयोग आणि शिक्षणासाठी आवश्यक सर्व सुविधांनी परिपूर्ण श्रेणीला पूर्णत्व देतात. व्ही६ पॅनेल्सच्या व्यतिरिक्त मॅक्सहबने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग उत्पादनांची एक शृंखला प्रस्तुत केली आहे. ही सर्व एकात्मिक कम्युनिकेशन गॅजेट्स आहेत ज्यामुळे स्पष्ट आणि प्रभावी पद्धतीने संवाद करणे सोपे बनते. मॅक्सहब व्ही६ तुमच्या मीटिंग्सना अजून जास्त प्रभावी बनवण्यासाठी, तुमचा व्यवसाय विकसित करण्यासाठी आणि तुमच्या संसाधनांना लिंक करण्यासाठी सुसज्ज आहे.