मुंबई:शिक्षण क्षेत्रातील मानाचा शिक्षक भारती सावित्री फातिमा उत्सव २०२४ खार एज्युकेशन बांद्रा पश्चिम येथे बुधवार दिनांक ७फेब्रुवारीला संपन्न झाला. यावेळी सावित्रा फातिमा पुरस्कार २०२४चे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी शैक्षणिक संकुलातील तीन महिला शिक्षिकांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्राथमिक विभागातील स्वप्नाली साळवी, माध्यमिक विभागातील कांचन पिंगळे, सीमा पाटील या शिक्षिकांना आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुंबई उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विविध शाळांमधील महिला मुख्याध्यापिका आणि महिला शिक्षिकांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.