विद्यानिधी शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

मुंबई : जुहू येथील उपनगर शिक्षण मंडळाच्या वतीने विद्यानिधी शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात संस्थेच्या परंपरेनुसार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतमाता पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे सनदी लेखापाल प्रकाश मुनी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या क्रार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सत्यनारायण काबरा, उपाध्यक्ष रमेशभाई मेहता, कार्याध्यक्ष संजीव मंत्री, सचिव डाॅ. साधना मोढ, नगरसेवक दीपक कोतेकर, आजीव सदस्य, संस्थेच्या विविध विभागांचे मुख्याध्यापक, शिक्षक,पालक आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे प्रकाश मुनी यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व, राष्ट्रप्रेम आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीते आणि भाषणातून उपस्थितांची मने जिंकली. समाजकार्यामध्ये सातत्याने योगदान देणाऱ्या उपनगर शिक्षण मंडळाच्या वतीने गेली ३०वर्षे सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरातून ६० रक्त पिशव्यांचे संकलन केले.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे निवेदन मोहन वाघ आणि ज्योती सिंग यांनी केले.